पडळकरांना विट्यातून इशारा; बिनशर्त माफी मागा अन्यथा जशास तसे उत्तर!

आमदार गोपीचंद पडळकर यांचे व्यक्तीमत्व आणि त्यांनी आजवर केलेले पक्षबदल पाहता आणि अनेक नेत्यांबद्दल केलेली बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्ये पाहता त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा करणे गैर आहे.
ex mla sadashivrao patil criticizes gopichand padalkar
ex mla sadashivrao patil criticizes gopichand padalkar

पुणे : "आमदार गोपीचंद पडळकरांच्या वयाच्या दुप्पट वयाची पवारसाहेबांची कारकीर्द आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाल्याप्रमाणे त्यांनी आमचे नेते शरद पवार यांच्यावर केलेली टीका आम्ही कदापी सहन करणार नाही. त्यांनी बेताल व संतापजनक वक्तव्याबद्दल बिनशर्त जाहीर माफी मागावी, अन्यथा पडळकरांना जशास तसे उत्तर देवू," असा इशारा माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.   

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक, खानापूर तालुकाध्यक्ष किसन जानकर, खानापूर विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन निकम, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष हरी माने यांची प्रमुख उपस्थिती होती.  

अ‍ॅड. सदाशिवराव पाटील म्हणाले, " पडळकरांनी वापरलेल्या भाषेचा आणि वक्तव्याचा खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जाहीर निषेध करत आहोत. आमदार गोपीचंद पडळकर यांचे व्यक्तीमत्व आणि त्यांनी आजवर केलेले पक्षबदल पाहता आणि अनेक नेत्यांबद्दल केलेली बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्ये पाहता त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा करणे गैर आहे. आमदार गोपीचंद पडळकरांच्या वयाच्या दुप्पट वयाची पवारसाहेबांची कारकीर्द आहे. पडळकरांना बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची सवयच आहे. विधानपरिषदेतील 78 आमदारांपैकी ते एक आहेत. अजून त्यांच्या आमदारकीला एक महिना पुर्ण व्हायचा आहे. आमदारकीची ओळख व्हायची आहे. आमदार झाल्यानंतर पडळकरांच्याकडून जबाबदारीचे आणि पोक्तपणाचे लक्षण अपेक्षित आहे. परंतु त्यांनी बेताल वक्तव्य केले. याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देवू. जर त्यांचे वर्तन सुधरले नाही तर भविष्यात प्रसंगी रस्त्यावर उतरून त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देवू."असे पाटील म्हणाले.      

अ‍ॅड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांनी बेताल व संतापजनक वक्तव्याबद्दल बिनशर्त जाहीर माफी मागावी.  यावेळी माजी सभापती अविनाश चोथे, राष्ट्रवादीचे विटा शहराध्यक्ष नितीन दिवटे, विटा शहर मुस्लिम ओबीसीचे अध्यक्ष इजाज मुल्ला, विटा शहर युवकचे अध्यक्ष सिध्दार्थ शितोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com