एक शरद शिवसेनेचे बाकी सगळे गारद : नारायण राणे

गणपती उत्सवात कोकणात येणाऱ्या लोकांना बंदी घालण्याच्या विषयाबाबत राणे म्हणाले, अशी बंदी घालता येणार नाही. ती बंदी आम्ही घालू देणार नाही. प्रसंगी आम्ही आम्ही आंदोलन करू. कोरोनाचे रूग्ण वाढू नयेत, यासाठी आम्ही सूचना करू.
 ex chief minister narayan rane criticizes shivsena leadership
ex chief minister narayan rane criticizes shivsena leadership

मुंबई: 'एक शरद शिवसेनेचे बाकी सगळे गारद' असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांची विस्तृत मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत खळबळजनक असल्याचा दावा केला जात आहे. त्या मुलाखतीचा प्रोमो संजय राऊत यांनी शेअर केला आहे. 'एक शरद सगळे गारद' अशी टॅगलाईन आहे. आता या टॅगलाईनवरून राज्यभरात टीकाटिप्पण्णी सुरू आहे. मुख्यत: भाजपकडून या मुलाखतीवर टिकेची झोड उठवण्यात येत आहे. 

माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात असताना यावर टिप्पण्णी केली. एक शरद सगळे गारद...यात उद्धव ठाकरेही येतात, असे फडणवीस म्हणाले. आमदार नितेश राणे यांनी नेहमीच्या शैलीत टीका केली आहे. आता नारायण राणे यात उतरले आहेत. आज पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, शिवसेनेत बोलण्यासाठी कोणीच नाही म्हणून शरद पवारांना नेतृत्व करावं लागत आहे. एक शरद शिवसेनेचे बाकी सगळे गारद, अशी परिस्थती आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांचीच कामे होत नाही. शिवसेनेच्या नेत्यांना कोणी भेटतही नाही. 

गणपती उत्सवात कोकणात येणाऱ्या लोकांना बंदी घालण्याच्या विषयाबाबत राणे म्हणाले, अशी बंदी घालता येणार नाही. ती बंदी आम्ही घालू देणार नाही. प्रसंगी आम्ही आम्ही आंदोलन करू. कोरोनाचे रूग्ण वाढू नयेत, यासाठी आम्ही सूचना करू.

उद्धव ठाकरे - प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा

मुंबई : मुंबईमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवास्थानी झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभुमीवर त्यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी दाखल झाले आहेत. तिथे त्यांची याप्रकरणी चर्चा सुरू आहे.

काल प्रकाश आंबेडकर यांनी राजगृहला भेट देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले होते. 'पोलिस तपास सुरू आहे. तोडफोड करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागची संघटना शोधली गेली पाहिजे. काही जण या प्रकरणाला वेगळे वळण द्यायचा प्रयत्न करत आहेत पण त्याकडे दुर्लक्ष करा. आपला फोकस हलू देवू नका', असे आंबेडकर म्हणाले होते.त्यानंरच आज प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी 'मातोश्री' निवासस्थानी दाखल झाले आहेत. प्रत्यक्ष हल्लेखोरापेक्षा त्याच्या पाठीमागे असणाऱ्या संघटनेवर कारवाईची त्यांची मागणी आहे. त्यांच्या चर्चेनंतर 'राजगृह'ला कायमस्वरूपी सुरक्षा मिळू शकते.

edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com