रायगडावरील हत्ती तलाव 150 वर्षांनंतर तुडुंब 

मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे ऐतिहासिक रायगडावरील हत्ती तलाव तुडुंब भरला आहे. जवळपास दीडशे वर्षांनंतर प्रथमच तो पूर्ण क्षमतेने भरला आहे, असे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे.
Elephant Lake at Raigad was filled to its full capacity after 150 years
Elephant Lake at Raigad was filled to its full capacity after 150 years

पुणे : मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे ऐतिहासिक रायगडावरील हत्ती तलाव तुडुंब भरला आहे. जवळपास दीडशे वर्षांनंतर प्रथमच तो पूर्ण क्षमतेने भरला आहे, असे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे. 

छत्रपती संभाजीराजेंच्या अध्यक्षतेखाली "रायगड विकास प्राधिकरण'च्या माध्यमातून रायगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत गडावरील तलावातील गाळ काढण्यात आला. त्यानंतर ज्या तलावांना, टाक्‍यांना गळती होती. त्यांची गळती थांबविण्याचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने हत्ती तलावाचा समावेश होता. 

गळती काढण्याच्या कामाचा पहिला म्हणजे, मागील मॉन्सूनच्या चार महिन्यात व नंतरच्या काळात हत्ती तलावाच्या गळतीचे निरीक्षण व दस्ताऐवजीकरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने गळतीच्या जागा, पाण्याची पातळी, जिवंत झरे, गळतीची कारणे, बांधकामाची पद्धत आदींच्या नोंदी घेऊन त्या आधारे प्राधिकरणाच्या तज्ज्ञ, वास्तुसंवर्धक व अभियत्यांमार्फत गळती काढण्याची शास्त्रोक्त व पारंपरिक साहित्याची पद्धत शोधण्यात आली. 

तलावातील नैसर्गिक कातळावर पाणी आडविण्याकरता जी भिंत बांधण्यात आली आहे, त्यातील सांध्याच्या जागेवरील बांधकामाचे (दोन दगडामधील जागा) मिश्रण मृत झाले होते. तिथे नव्याने तयार केलेले मिश्रण भरणे गरजेचे आहे, त्यामुळे गळती पूर्णपणे रोखण्यास मदत होईल, असा अभिप्राय तज्ज्ञांनी दिला. 

हे काम करताना भिंतीवर गळती असलेल्या जागी दोन दगडामधील सांधीत जोरात पाणी फवारले जाते. जेणेकरुन जुने मृत मिश्रण धुतले जाईल. त्यानंतर पारंपारिक सहित्य म्हणजे भिजवलेला चुना, विटाची भुकटी, वाळू व बेलफळाचे पाणी हे ठरविलेल्या प्रमाणात मिश्रण करून गळतीच्या ठिकाणी मशिनच्या साहाय्याने मृत झालेल्या सांध्यात टाकण्याचे ठरविण्यात आले. मिश्रण वाळण्यासाठी योग्य तो वेळ त्याला देण्यात आला. 

आतापर्यंत हत्ती तलावाचे काम 60 टक्‍क्‍यांपर्यंत झाले आहे. उर्वरित 40 टक्के काम हे कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पूर्ण करता आले नाही. जितके काम झाले आहे, त्याचे चांगले परिणाम दिसत असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. 

 "असे क्षण जीवनात खूप कमी येतात. ज्याचं समाधान आयुष्यभर लाभतं. सर्व शिवभक्तांना सांगताना आनंद होत आहे, की रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून आपण जे काही काम हाती घेतले. त्याला यश येत आहे. हत्ती तलावाचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून तलावाला अजूनही एका ठिकाणी गळती आहे. त्या गळतीचा व्यवस्थित अभ्यास करून तीसुद्धा बंद केली जाईल. 
- संभाजीराजे, खासदार 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com