खडसेंना ‘ईडी’ कडून चौकशीसाठी १४ दिवसांची मुदत मंजूर - ED approves 14 days extension for khadase to appear before agency | Politics Marathi News - Sarkarnama

खडसेंना ‘ईडी’ कडून चौकशीसाठी १४ दिवसांची मुदत मंजूर

कैलास शिंदे
बुधवार, 30 डिसेंबर 2020

खडसे यांना कोरोनाची लक्षणे 

जळगाव : माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी चौदा दिवसाची मुदत मंजूर करण्यात आली असल्याची माहिती स्वत: खडसे यांनीच एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

खडसे यांना भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी चौकशीसाठी ‘ईडी’(सक्त वसुलीसंचलनालय)यांनी नोटीस बजावली आहे. त्यांना आज बुधवार (ता. ३०) हजर राहण्याचे कळविण्यात आले होते. मात्र खडसे यांनी हजर न राहता, चौकशीसाठी मुदत मागितली होती. त्याबाबत यांनी ‘ईडी’ला पत्रही दिले होते.त्यानुसार त्यांना ईडीने मुदत मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबत त्यानी प्रसिध्दी पत्रक दिले आहे.

यात त्यांनी म्हटले आहे, कि आपल्याला ३०डिसेबंर रोजी मुंबई येथील ‘इडी’कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत समन्स प्राप्त झाले होते. आपण या चौकशीसाठी ‘ई,डी.)कार्यालयात बुधवार (ता. ३०)रोजी  हजर होणार होतोच. मात्र मध्यतंरी २८ डिसेंबर रोजी ताप सर्दी व कोरडा खोकल्याचा सौम्य त्रास जाणवला, तपासणी अंती कोरोना सदृश्‍य लक्षणेअसल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सागितले, त्यांनी कोरोनाची चाचणी घेतली. निष्कर्ष अद्याप प्रलंबीत आहेत. वैदयकिय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार चौदा दिवसाची विश्रांती आवश्‍यक आहे.तसेच आपण ईडी कार्यालयास कळविले आहे. त्यानी चौदा दिवसानंतर हजर होण्यास संमती दिली आहे. माझी प्रकृती बरी झाल्यावर आपण ‘ईडी़’ला चौकशीसाठी संपूण सहकार्य करणार आहोत.

भोसरी एमआयडीसीतील भूखंडाचे आहे प्रकरण-

एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ‘ईडी’ने चौकशीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधी देखील याच प्रकरणी खडसे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभाग तसेच झोटिंग समितीने चौकशी झाली होती. आता याच प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली आहे.आज (ता.३०) त्यांची चौकशी करण्यात येणार होती. या चौकशीसाठी ते जळगाव येथून मुंबई येथे रवानाही झाले आहेत.  मुंबई येथे त्यांच्या निवास्थानी ते आहेत. त्यांच्या समवेत पत्नी सौ. मदांकिनी खडसे व कन्या सौ.रोहिणी खडसे आहेत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख