'ईस्टन फ्री वे' ला "माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे नाव द्या" - Easton Freeway to former Chief Minister late. Name Vilasrao Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

'ईस्टन फ्री वे' ला "माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे नाव द्या"

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

पुर्व मुक्त मार्गाला  (Eastern Free Way)   माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी अस्लम शेख यांनी  एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  केली आहे. 

मुंबई : पुर्व मुक्त मार्गाला  (Eastern Free Way)   माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. एका पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अस्लम शेख यांनी ही मागणी केली आहे. 

अस्लम शेख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, मुंबईची वाहतुक कोंडी लक्षात घेत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांना जोडणाऱ्या पुर्व मुक्त मार्गाची संकल्पना मांडली. विलासराव देशमुख यांच्यामुळेच हा मार्ग तयार होऊ शकला.

 या रस्त्याची लांबी १६.८ किलोमीटर असून दक्षिण मुंबईतील 'पी डीमोलो रोड पासून ते चेंबुर येथील पुर्व द्रुतगती मार्गास हा मार्ग जोडतो. सध्या हा रस्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आहे. या रस्त्यास माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देणं ही त्यांच्या कार्याची पोहच पावती असेल असंही अस्लम शेख यांनी पत्रात  म्हटल आहे.

हेही वाचा : भर रस्त्यात महिलेच्या शिव्या खाणाऱ्या पोलिसाचा आयुक्तांकडून सत्कार..   

मुंबई : काळबादेवी परिसरात कॉटन एक्‍स्चेंज नाका येथे एका महिलेने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात पोलीस हवालदार एकनाथ श्रीरंग पारठे यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यांनी या घटनेत संयम बाळगला आणि परिस्थिती आटोक्यात आणली होती. पारठे यांच्या या कामगिरीबाबत मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी कैातुक केले आहे. त्यांना दहा हजार रूपये, प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे.  काळबादेवी परिसरात कॉटन एक्‍स्चेंज नाका येथे एका महिलेने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याचा प्रकार तीन दिवसापूर्वी समोर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे पोलिसांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. पोलिसांवर अशा प्रकारे हात टाकणाऱ्यांवर समाजानेच बहिष्कार टाकायला हवा, अशी भूमिका राऊत यांनी घेतली होती.   

पोलिसांनी या प्रकरणी सादविका रमाकांत तिवारी (वय 30, रा. मशीद बंदर) आणि मोहसीन निजामउददीन खान (26, रा. भेंडी बाजार) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. कॉटन एक्‍स्चेंज नाका येथे वाहतूक पोलिस हवालदार एकनाथ पारठे हे कर्तव्य बजावत असताना सादविका या महिलेसोबत एक व्यक्ती होता. त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे या महिलेने वाद करून वाहतूक हवालदार पारठे यांना मारहाण केली. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख