पंकजा मुंडे म्हणाल्या, "गोपीनाथ गडावर यंदा कार्यक्रम नाही.." - Due to corona no event at Gopinath fort this year Pankaja Munde | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडे म्हणाल्या, "गोपीनाथ गडावर यंदा कार्यक्रम नाही.."

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम होणार नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी यांनी केलं आहे. 

परळी : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा उद्या (ता.12) वाढदिवस. यानिमित्ताने दरवर्षी गोपीनाथ गड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा मात्र, कोरोनामुळे गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम होणार नाही, असं गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडें यांनी सांगितलं आहे. यंदा गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम होणार नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी, असे आवाहन
पंकजा मुंडे यांनी यांनी केलं आहे. 

बीडमध्ये पत्रकारांशी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की कोरोना महामारीचं संकट लक्षात घेऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करावे, 12 डिसेंबर हा जन्मदिवस आणि 3 जून या स्मृतीदिनी आतापर्यंत गोपीनाथ गडावर मोठ मोठे नेते, मंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर, छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे आदींनी उपस्थित राहून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. यंदा मात्र दरवर्षी सारखा मोठा कार्यक्रम होणार नाही.   

यंदा सर्व सामान्य जनता कोरोनाच्या संकटात सापडली आहे, अशा परिस्थितीत कोणालाही त्रास न होता वेगळ्या पद्धतीने 12 डिसेंबर हा दिवस साजरा करायचा आहे. सभा, गर्दी टाळायची आहे. मी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून सर्वांनी गडावर दर्शन घ्यायचे आहे. महामारीच्या या संकटात सामाजिक उपयोगिता आणि आवश्यकता लक्षात घेऊन सर्वांनी 12 ते 15 डिसेंबर दरम्यान ठिकठिकाणी रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

हेही वाचा : पवारांच्या नांवाची चर्चा म्हणजेच काँग्रेस संपवण्याचा डाव..
मुंबई : दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संपवण्याची मोहिम सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे UPA चे अध्यक्षपद देण्याची मोहिम राबवली जात आहे, असा आरोप मुंबईचे काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे. याबाबत निरूपम यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी हा आरोप केला आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. २३ नेत्यांच्या सह्यांचे पत्र काँग्रेस अध्यक्षांना पाठविण्यात आले होते. त्याचाही उल्लेख निरुपम यांनी या ट्वीटमध्ये केला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख