राष्ट्रवादीला मोठा धक्का..धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये... 

डाँ. धवलसिंह हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
dmp27.jpg
dmp27.jpg

अकलूज : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अकलूज येथील डाँ धवलसिंह मोहिते पाटील उद्या आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह कॅाग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राज्य कुस्तीगिर संघटनेचे उपाध्यक्ष असलेले डाँ. धवलसिंह हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. 

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर धवलसिंह आणि राष्ट्रवादीचे जवळचे संबंध निर्माण झाले होते. विधान सभा निवडणुकीत धवलसिंह यानी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकरांचा प्रचार ही केला होता. परंतु राष्ट्रवादीने पक्षाने आपली दखल घेतली नसल्याने ते नाराज होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्या मुंबईत टिळक भवनात काॅग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पत्नी उर्वशीराजे मोहिते पाटिलसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी ते शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये होते.

हेही वाचा : जयंत पाटील करणार १८ दिवसांत ३ हजार किलोमीटरचा प्रवास
  
मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे गुरूवारपासून 'राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याला सुरुवात करणार आहेत.याबाबतची घोषणा शनिवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली होती. गुरुवार दिनांक २८ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्हयातील अहेरी येथून पहिल्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षातील इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सलग १८ दिवस ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जयंत पाटील संवाद साधणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच संवाद, समन्वय व पारदर्शकतेची भूमिका घेतली आहे. याआधीही पक्षाने कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' ही डिजिटल मोहीम हाती घेतली होती. राज्यातील कार्यकर्त्यांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सात लाख कार्यकर्त्यांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी आपला अभिप्राय या मोहिमेत नोंदवल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याच्या १८ दिवसामध्ये विदर्भ व खान्देशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या १३५ बैठका व १० जाहीर सभा होणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार असे १४ जिल्हे पायाखाली घालत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेणार आहेत  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com