धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत राजकारण करू नका...   - Dont do politics about starting religious places  | Politics Marathi News - Sarkarnama

धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत राजकारण करू नका...  

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

धार्मिक स्थळ सुरू करण्यासाठी काही राजकीय नेते प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांनी सोशल मीडियावर व्हिडोओ शेअर केला आहे.

मुंबई : "काही राजकीय पक्षांचे नेते धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या मुद्द्याच्या आढून आपला राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करण्याआधी भाजपा शासित राज्यांमध्ये बंद असलेली धार्मिक स्थळं सरु करण्यासाठी तेथील मुख्यमंत्र्यांवर दबाव आणावा," असे मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. 

कोरोनामुळे बंद असलेली धार्मिक स्थळ सुरू करण्यासाठी काही राजकीय नेते प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांनी सोशल मीडियावर व्हिडोओ शेअर केला आहे. अस्लम शेख म्हणाले की महाराष्ट्रात रेल्वे सेवा, बस सेवा, मॅाल्स, औषधांची दुकानं, उपहारगृहं व अन्य सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. पण त्यामागचा उद्देश लोकांचा रोजगार जाऊ नये व राज्याची अर्थव्यवस्था सुधारणे हा आहे. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं सुरु करण्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. याचा अभ्यास करून याबाबतची नियमावली ठरवली जाईल. यामध्ये कोणीही राजकारण करु नये.

संबंधित लेख