आजारी बहिणीसाठी धनंजय मुंडे भावूक; काळजी घे, लवकर बरी हो म्हणत दिला धीर..

परळी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर या नातेसंबंधात अधिकच अंतर आल्याचे पहायला मिळालेे. अगदी जिल्ह्यातील निधी, वैद्यनाथ साखर कारखान्याला मिळालेली थकहमी ते ऊसतोड मजुर आंदोलना यात या दोन बहिण भावांनी संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर टीका करण्याची आणि श्रेय घेण्याची संधी सोडली नाही. हे जरी खरे असले तरी कौटुबिक सुख-दुःखात राजकारण येऊ द्यायचे नाही, हा शिरस्ता दोघांनीही पाळल्याचे दिसून आले.
Minsiter dhnanjay munde twite news aurangabad
Minsiter dhnanjay munde twite news aurangabad

औरंगाबाद ः राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वैर राज्याला नवे नाही. पण राजकारण आणि रक्ताची नाती यात या दोघांनीही कधी अंतर येऊ दिले नाही. मला सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास होत असल्याचे ट्विट पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपुर्वी केले होते. त्यावर मंगळवारी (ता.१) धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत बहिणीच्या आजारपणाबद्दल काळजी व्यक्त केली. पंकजा ताई स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घे, तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो, मोठा भाऊ म्हणून मी तुझ्या सोबत आहे, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना धीर दिला.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मतदान अवघ्या काही तासांवर आलेले असतांना भाजपच्या माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुुंडे या आजारी पडल्या. सर्दी, ताप आणि खोकला असल्यामुळे जबाबदारी म्हणून मी आयसोलेट होत असल्याचे ट्विट आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी नुकतेच केले होते. या ट्विटवर धनंजय मुंडे यांनी काल प्रतिक्रिया व्यक्त केली. बहिणीच्या आजारपणाची माहिती कळताच मोठा भाऊ म्हणून त्यांनी पकंजा मुंड यांना कोरोनाच्या सर्व चाचण्या करून घेण्याचा सल्ला दिला. 

`पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे. तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये, कोरोना विषयक सर्व चाचण्या करून घे, स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे, तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो, मोठा भाऊ म्हणून मी तुझ्या सोबत आहे`, अशा शब्दांत मुंडे यांनी  पंकजा मुंडे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करत  धीर दिला आहे. यातून राजकारणापेक्षा आमचे कौटुंबिक नाते महत्वाचे आणि घट्ट असल्याचे धनंजय मुंडे यांनी दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

पंकजा आणि धनंजय मुंडे या दोन बहिण भावांमधील संबंध गेल्या काही वर्षापासून बिघडले आहेेत.  विशेषतः परळी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर या नातेसंबंधात अधिकच अंतर आल्याचे पहायला मिळालेे. अगदी जिल्ह्यातील निधी, वैद्यनाथ साखर कारखान्याला मिळालेली थकहमी ते ऊसतोड मजुर आंदोलना यात या दोन बहिण भावांनी संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर टीका करण्याची आणि श्रेय घेण्याची संधी सोडली नाही. हे जरी खरे असले तरी कौटुबिक सुख-दुःखात राजकारण येऊ द्यायचे नाही, हा शिरस्ता दोघांनीही पाळल्याचे दिसून आले.

राज्यात कोरोनाची  लाट आली तेव्हा धनंजय मुंडे यांना कोरोना संसर्ग झाला होता. मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार आणि त्यानंतर काही दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. तेव्हा बहिण म्हणूुन पंकजा मुंडे यांनी देखील भावाच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या. आता पंकजा मुंडे आजारी पडल्यानंतर धनंजय मुंड यांनी देखील बहिणीच्या प्रकृतीची विचारपूस करत राजकारणापेक्षा बहिण-भावाचे नाते अधिक घट्ट असल्याचे दाखवून दिले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com