फडणवीस म्हणतात, राज्यात पंचनामे सुरू असल्याचे कुठेही दिसत नाही 

राज्य सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना तत्काळ मदत करावी.
Devendra Fadnavis Says, the work of Panchnama is not seen anywhere in the state
Devendra Fadnavis Says, the work of Panchnama is not seen anywhere in the state

पुणे : राज्यात विशेषतः मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्यात कुठेही पंचनामे सुरू असल्याचे दिसून येत नाहीत, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 16 ऑक्‍टोबर) केला. 

फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी केली आहे. 

ते म्हणाले की राज्यात विशेषतः मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणी गंजीच्या गंजी वाहून गेल्या आहेत. ही सर्व पिके बाजारात नेता येतील, अशा अवस्थेत होती. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्यात कुठेही पंचनाम्याची कामे सुरू असल्याचे दिसून येत नाहीत. अशा कठीण काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वप्रथम मदत घोषित केली गेली पाहिजे. नुकसानग्रस्तांना प्राथमिक मदत दिली पाहिजे. पंचनाम्याची कामे होत राहतील, त्यानंतर दीर्घकालीन उपयोगी ठरणारी मदत शेतकऱ्यांना द्यावी लागेल. कारण, शेतकरी या अतिवृष्टीच्या संकटात आज पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाला आहे. 

या अतिवृष्टीत कापूस, सोयाबीन, ऊस किंवा इतर पिके आणि विशेषतः फळबागा यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हे भरून न येणारे नुकसान झालेले आहे, त्यामुळे राज्य सरकारने या शेतकऱ्यांच्या पाठीशी तत्काळ उभे राहावे, अशी आमची या सरकारकडून अपेक्षा आहे. 

Edited By vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com