भाजपने नगराध्यक्षांचे काढलेले अधिकार आघाडी सरकारकडून पूर्ववत..371 पालिकांच्या विकासाला गती..

राज्यातील 371 शहराच्या विकासाला गती मिळणारआहे.
Municipality20.jpg
Municipality20.jpg

मंगळवेढा : तत्कालीन भाजप सरकारने थेट जनतेने निवडलेल्या नगराध्यक्षांकडील काढलेले अधिकार पुन्हा महाविकास आघाडी सरकारने पुर्ववत पुन्हा अधिकार बहाल केल्याने त्याचा फायदा राज्यातील 371 नगराध्यक्षांना मिळणार असल्यामुळे शहराच्या विकासाला गती येणे शक्य होणार आहे
   
सचिन वाझेंच्या विरोधात ATS कडे परिस्थितीजन्य भक्कम पुरावे.. 
       

२०१८ मध्ये भाजप सरकारने नगर परिषद व नगरपंचायती अधिनियमाच्या कलम ५८ नुसार नगराध्यक्षांना प्राप्त प्रशासकीय अधिकार काढून टाकले. ते अधिकार मुख्याधिकारी यांना सर्व प्रशासकीय अधिकार प्रदान केले होते. त्यामुळे नगरपरिषदेत लालफितशाही अस्तित्वात येऊन जनतेची कामे करणे नगराध्यक्षांना कठीण होऊन बसले होते. घटनेच्या ७३ व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज असलेल्या संस्था बळकट करण्यात आल्या होत्या आणि या स्वायत्त  संस्थांवर प्रशासनाची  निर्बंध कमी करण्यात आले ; परंतु मागील सरकारने नगरपरिषद कायद्यात दुरुस्ती करून लोकनियुक्त नगराध्यक्ष व सदस्यांच्या अधिकार कमी करून ते मुख्याधिकारी यांना प्रदान केले होते. त्यामुळे लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांना जनतेची कामे करणे अशक्य झाले होते. 

महाविकास आघाडी सरकारने यामध्ये बदल करत लोकप्रतिनिधी हे जनतेमधून निवडून आलेले असतात त्यांच्यामधून नगराध्यक्ष निवडलेला असतो नगराध्यक्षाला जनते प्रती उत्तरदायित्वास असते मुख्याधिकारी पदावरील अधिकारी हा प्रशासन आलेला असल्याने तो मनमानी पद्धतीने काम करीत असतो आणि निर्णय घेत असतो त्याचा परिणाम नागरिकांवर होत असतात परिणामी हवा तसा न्याय देता येत नाही, अशा परिस्थितीत नगरपालिकेच्या वित्तीय व कार्यकारी प्रशासनावर नगराध्यक्षपदी पदावरील अधिकाऱ्यांचे लक्ष व नियंत्रित असणे आवश्यक वाटल्याने त्यांना पूर्वीप्रमाणे अधिकार महाविकास आघाडी सरकारने दिल्याने नगराध्यक्षामधून सरकारच्या निर्णयाचे अभिनंदन होत आहे.


शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष जनतेमधून निवडला गेला परंतु विकासाच्या कामावर मर्यादा तत्कालीन सरकारच्या आदेशामुळे आल्याने नागरिकाकडून विकास कामाच्या मागणी पुर्तता करू शकत नव्हती, यात मुख्याधिकारीच वरचढ होऊ लागल्याने विकासाची गती मंदावून प्रशासन व लोकप्रतिनिधीत वाद वाढल्याची ही बाब महाविकास आघाडी सरकारच्या लक्षात आल्यामुळे पूर्वीप्रमाणे नगराध्यक्षांना अधिकार दिल्यामुळे उर्वरित काळात शहराच्या विकासाला गती देणे शक्‍य होणार आहे. 

अरुणा माळी नगराध्यक्ष मंगळवेढा 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com