इतरांच्या भानगडी बाहेर काढायच्या का? अजित पवारांचा विरोधकांना सूचक इशारा

बलात्काराची तक्रार मागे घेऊनही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले.
Deputy CM Ajit Pawar Slams Opposition leader on Dhananjay Munde Issue
Deputy CM Ajit Pawar Slams Opposition leader on Dhananjay Munde Issue

मुंबई : बलात्काराची तक्रार मागे घेऊनही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. 'विरोधकांनी उगाचच फाटे फोडू नयेत. मग इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर विषय खूप लांब जाईल. कोणी काय लपवाछपवी केलीय हे संगळ्यांनाच माहिती आहे,' अशा शब्दांत पवार यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला.

रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. तसेच करूणा शर्मा यांच्याविषयीही त्यांनी फेसबुकवर सविस्तर खुलासा केला आहे. मात्र, विरोधकांकडून सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. याविषयी अजित पवारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी विरोधकांना फटकारले.

पवार म्हणाले, धनंजय मुंडे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत खुलासा केला आहे. तरीही त्यांच्यावर टीका होत आहे. आता विरोधक तोंडघशी पडल्यानंतर वेगळा आरोप केला जात असला तरी त्याला मर्यादा हवी. मुंडे यांना करूणा शर्मा यांच्याबाबत जे सांगायचे होते ते जाहीरपणे सांगितले आहे. विरोधक उगाचच फाटे फोडत आहेत. आतापर्यंत कोणी काय लपवाछपवी केली हे सगळ्यानाच माहित आहे. मग इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर विषय खूप लांब जाईल, असा इशारा पवार यांनी दिला.

मुंबईऐवजी राज्यभर आंदोलन हवे होते...

कृषी कायद्यांविरोधात मुंबई सुरू असलेल्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केवळ मुंबई आंदोलन न करता राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्याची भुमिका मांडली होती. ते म्हणाले, शेतकरी आंदोलनाला महाविकासआघाडीचा पाठिंबा असून या कायद्यांची अंमलबजावणी राज्यात करतच नाही. केंद्र सरकार जोपर्यंत नवीन निर्णय घेत नाही, तोपर्यंत काही करण्याची गरज नाही. 

पण आंदोलन तालुका स्तरावर करता आले असते. एकीकडे आम्हीच नियमावली करायची आणि आम्हीच गर्दी करायची हे बरोबर नाही. मुंबई ऐवजी चांद्यापासून बांद्यापर्यंत आंदोलने व्हायला हवी होती. पण आंदोलनाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचे पवार म्हणाले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com