वंचित बहुजन युवा आघाडीची "गाव तेथे शाखा आणि वार्ड तेथे बोर्ड" मोहीम - Deprived Bahujan Youth Front launches Village There Branch and Ward There Board campaign | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

वंचित बहुजन युवा आघाडीची "गाव तेथे शाखा आणि वार्ड तेथे बोर्ड" मोहीम

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युवा आघाडीची बांधणी सुरू करण्यात आली आहे.

अकोला : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने "ऑनलाईन सदस्य नोंदणी" सुरू करण्यात आली आहे. त्या "ऑनलाईन सदस्य नोंदणी गुगल फॉर्म" सार्वजनिक करीत युवा आघाडी सदस्य नोंदणी मोहीमेचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युवा आघाडीची बांधणी सुरू करण्यात आली. २३ नोव्हेंबर २०२० पासून प्रदेश कार्यकारणी राज्यातील विविध जिल्ह्यातील दौरे प्रारंभ करणार आहेत. "गाव तेथे शाखा आणि वार्ड तेथे बोर्ड" ही मोहीम राज्यभर उभारली जाणार आहे. घर तेथे वंचित युवा आघाडीचा कार्यकर्ता निर्माण करण्याचा संकल्प प्रदेश पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

युवा आघाडीच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी गुगल फॉर्म" सार्वजनिक करीत युवा आघाडी सदस्य नोंदणी मोहीमेचे अॅड. बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे हस्ते यशवंत भवन अकोला येथे उदघाटन करून नोंदणी खुली करण्यात आली.या नोंदणी मोहिमेत लाखो संख्येने युवा कार्यकर्त्यांनी नोंदणी करून युवा आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केले आहे.

हेही वाचा : पैलवान खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्कार मिळवून देऊ : संभाजीराजे  

कोल्हापूर : भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते पै. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी गेल्या काही दिवसापासुन जोर धरत आहे. या मागणीला खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्ली दरबारी ही मागणी पोहचवू असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले आहे. स्वातंत्र्यांनंतर भारताच्या पदरात पहिले ऑलिम्पिक पदक टाकणारे महाराष्ट्राचे मल्ल पै.खाशाबा जाधव यांना आजतागायत पद्म पुरस्काराने गौरवले नाही. शासकीय पातळीवर क्रीडाविषक धोरणात असणारी अनास्था दूर व्हावी, यासाठी कुस्ती मल्लविद्या महसंघाचे प्रवक्ते पै. संग्रामसिंह कांबळे चळवळीच्या मदतीने प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिफारस पत्र देऊन सहभाग नोंदवला आहे. व यांना पद्म पुरस्कार मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख