संरक्षणमंत्र्यांचे चीनच्या सीमेवर शस्त्रपूजन ; सैनिकांना दिल्या शुभेच्छा... - Defense Minister Worship of arms on Chinese border  Congratulations to the soldiers | Politics Marathi News - Sarkarnama

संरक्षणमंत्र्यांचे चीनच्या सीमेवर शस्त्रपूजन ; सैनिकांना दिल्या शुभेच्छा...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

आज सकाळी त्यांनी नाथू ला पास येथे येऊन दसर्‍याच्या दिवशी सैनिकांना शुभेच्छा दिल्या.

दार्जिलिंग : विजयादशमी निमित्त दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारकात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज शस्त्रपूजन केले. राजनाथ यांनी ट्विटरद्वारे देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या दौऱ्यावर संरक्षण मंत्री आहेत.  त्यांच्यासोबत लष्करप्रमुख मनोज नरवणे देखील उपस्थित होते. रविवारी सकाळी त्यांनी नाथू ला पास येथे येऊन दसर्‍याच्या दिवशी सैनिकांना शुभेच्छा दिल्या.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की सैनिकांचे धाडस सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल. लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर जे काही झाले आणि आपल्या जवानांनी ज्याप्रकारे शौर्याने प्रत्युत्तर दिले, इतिहासकार आपल्या जवानांची ती वीरता आणि साहस सुवर्ण अक्षरात लिहितील. चीनसोबतचा सीमावादावर सुरू असलेला तणाव संपला पाहिले अशी भारताची इच्छा आहे. 

"या भागात शांती कायम राहावी. परंतु, आपले सैन्य आपल्या जमिनाचा एक इंचाही भाग कोणाला देणार नाही असा मला विश्वास आहे. भारतीय सेनेच्या जवानांशी भेट घेतल्यास मला खूप आनंद होते. त्यांचे मनोबल उंचावले गेले आहे. त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे," असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

राजनाथ यांनी शनिवारी दार्जिलिंगच्या सुकना येथील 33 कोरच्या मुख्यालयाचा दौरा पूर्ण करून पूर्व क्षेत्रातील सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला होता. चीनसोबतचा सीमावादावर सुरू असलेला तणाव संपला पाहिले अशी भारताची इच्छा आहे. या भागात शांती कायम राहावी. परंतु, आपले सैन्य आपल्या जमिनाचा एक इंचाही भाग कोणाला देणार नाही असा मला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.  चीनशी तणाव असताना संरक्षणमंत्र्यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर चीन सीमेवर जाऊन जवानांचे शस्त्र पूजनाने मनोधैर्य वाढवणे याला रणनैतिक महत्त्व आहे. 

हेही वाचा : ३१ आँक्टोबरला 'राष्ट्रीय एकता दिवस'.. मोदींची घोषणा
 
नवी दिल्ली : सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती (३१ आॅक्टोबर) राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून आज केली. या कार्यक्रमाला आज सहा वर्षे पूर्ण झाली. ३१ आॅक्टोबर ही दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. त्यांनाही मोदी यांनी आदरांजली अर्पण केली.

आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांनी विविध विषयांवर देशवासियांशी संवाद साधला. देशातील जनतेला विजयादशमीच्या व दुर्गापुजेच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले, "संकटावर संयमाने मान करण्याचा हा दिवस आहे. आज तुम्ही आम्ही सर्वजण खूप अवघड परिस्थितीतून जात आहोत. अत्यंत संयमाने सणवार साजरे करत आहोत. दुसरीकडे कोरोनाशी लढाही देत आहोत. या लढ्यात विजय निश्चित आहे,'' सणवारासाठी खरेदी करताना 'व्होकल फाॅर लोकल' हा मंत्र लक्षात ठेवण्याचे आवाहनही मोदी यांनी केले.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख