शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर.... - Decision to start school after Diwali  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर....

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

अजित पवार म्हणाले, "दिवाळीपर्यंत शाळा सुरू होणार नाही. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याबाबत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल." 

मुंबई : देशात ता.15 ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. तरी महाराष्ट्रात शाळा कधीपासून सुरू होणार याबाबत स्पष्टता नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असल्याचेही केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात कधीपासून शाळा सुरू होणार याबाबत प्रशासन, पालकांमध्ये मतभिन्नता आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. अजित पवार म्हणाले,  "शाळा सुरू करण्याबाबत अन्य राज्यांनी घाई केल्यामुळे अनेक मुले कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे दिवाळीपर्यंत शाळा सुरू होणार नाही. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याबाबत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल." 

दिवाळीनंतर शाळा सुरू होणार का? शाळा सुरू करण्याला पालक आणि संस्थाचालकांची सहमती आहे का? सुरुवातीला केवळ नववी ते बारावी शाळा सुरू होतील का? शाळा सुरू होण्यास विलंब होत असल्याने पुढील शैक्षणिक वर्षही उशिराने सुरू होईल का? असे अनेक प्रश्न सध्या पालकांच्या मनात आहेत. राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्याप आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे  लगेच शाळा सुरू होणार नाहीत. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची राज्य सरकारची मानसिकता असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नुकतेच सांगितलं आहे.

संबंधित लेख