ग्रंथालये दोन दिवसात सुरू होणार..? राज ठाकरेंची उदय सामंत यांच्याशी बातचीत  - Decision to start libraries in next two days | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रंथालये दोन दिवसात सुरू होणार..? राज ठाकरेंची उदय सामंत यांच्याशी बातचीत 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

राज्यातील ग्रंथालये सुरू करण्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असं सामंत यांनी राज ठाकरे यांना सांगितलं.

मुंबई : लॅाकडाउनपासून राज्यात बंद असलेली ग्रंथालये आणि अभ्यासिका तातडीने सुरू करण्याबाबत ग्रंथालयाच्या विश्वस्तांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. याबाबत राज ठाकरे यांनी उच्चतंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर चर्चा केली. राज्यातील ग्रंथालये सुरू करण्याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असं सामंत यांनी राज ठाकरे यांना सांगितलं.

ग्रंथालयाच्या सुरू करण्यासाठी ग्रंथालयाच्या विश्वस्तांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी उदय सामंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जिम, सिनेमागृह, हॉटेल सुरू करण्याबाबत मनसेनं पुढाकार घेतला होता. ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्याची विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे नुकतेची केली आहे. 

याबाबत सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयास पत्र दिले आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच पुढाकार घेत आहेत. ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. सुळे म्हणाल्या की ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री लवकर विद्यार्थ्यांना गोड बातमी देतील, अशी अपेक्षा आहे.  
 

जिम, सिनेमागृह, हॉटेल व्यावसायिक यानतंर आता विद्यार्थ्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसापूर्वी सिनेमागृह, हॅाटेल पुन्हा सुरू करण्याबाबत मागणी केली होती. याबाबत त्यांनी टि्वट केलं होतं. लॅाकडाउनमुळे राज्यातील हॉटेल,  व्यावसायिक रेस्टॉरंट चालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होतं. यावर तोडगा काढण्याची विनंती त्यांनी सरकारला केली होती.

 

हेही वाचा : मास्कच्या किंमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य
 
मुंबई  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या अशा किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. एन-९५ मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण १९ ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध होईल तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील. समितीने निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासन मान्यतेनंतर सुधारीत दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख