त्या निर्णयाचा फायदा विकासकांना नाही तर ग्राहकांनाच : अजित पवार - decision to give 50 percent discount on all premiums to construction only benefits the consumers | Politics Marathi News - Sarkarnama

त्या निर्णयाचा फायदा विकासकांना नाही तर ग्राहकांनाच : अजित पवार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 जानेवारी 2021

राज्य सरकारचा कारभार किमान समान कार्यक्रमावर सुरू आहे, असे अजित  पवार यांनी सांगितले. 

मुंबई :  बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर 50 टक्के सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने काल घेतला आहे. या निर्णयावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ग्राहकांचे हित लक्षात न घेता हा निर्णय घेतला असल्याचे विरोधकांचे मत आहे. 

या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ''ही सवलत ग्राहकांच्या फायद्याची आहे. या निर्णयाचा विकासकांची नाही तर ग्राहकांनाच फायदा होणार आहे, याबाबत विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहे.'' राज्य सरकारचा कारभार किमान समान कार्यक्रमावर सुरू आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले. 

राज्य मंत्रिमंडळाने  जो निर्णय घेतला, त्यामुळे केवळ काही विकासकांनाच मोठा फायदा होणार आहे. कुठलीही सवलत द्यायला आमचा नकार नाही. कोरोनानंतरच्या काळात काही सवलती दिल्याही पाहिजेत. पण ज्या पद्धतीने ही सवलत देण्यात आली, त्याचे फायदे केवळ काही विकासकांना होणार आहेत, असे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणीस म्हणाले की आम्ही जे आक्षेप नोंदविले होते, त्यावर त्यांनी एक निर्णय केला की, ज्या वर्षीचे दर अधिक असतील, तो आधार मानण्यात येईल. पण दुसरा जो निर्णय स्टँप ड्युटी बिल्डरने देण्यासंदर्भातील केला, त्याचा फारसा लाभ होणार नाही. कारण बिल्डरला मिळणारा फायदा आणि त्याला द्यावी लागणारी स्टँप ड्युटी यात फार मोठे अंतर आहे.

अजित पवार म्हणाले, ''कांजूरमार्ग जागेबाबत शहानिशा करण्यात येत आहे. तर ओैरंगाबाद नामातंराबाबत महाविकास आघाडीमध्ये वाद नाही.'' राज्य सरकारला जीएसटीची रक्कम प्रत्येक आठवड्याला मिळते. पण सध्या केंद्राकडून जीएसटीचा परतावा आलेला नाही. 

उद्धव ठाकरे - गडकरी आज भेटणार ; अजित पवारही राहणार उपस्थित
मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे राज्यातील नेते दररोज आरोप करत असताना आज केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी सह्याद्री अतिथीगृहात चर्चा करणार आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडीतले घटक पक्ष आणि विरोधात असलेला भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न, मेट्रो कारशेडचा मुद्दा, राज्याच्या पोलिस महासंचालयांनी मागितलेली प्रतीनियुक्ती अशा विविध मुद्यांवरुन उभयतांत शाब्दिक हल्ले सुरु आहेत.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख