आगीतून फुफाट्यात पडलो, अशी वेळ येऊ देणार नाही : अजित पवार - Dalit Panther activists join NCP in the presence of Deputy CM Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

आगीतून फुफाट्यात पडलो, अशी वेळ येऊ देणार नाही : अजित पवार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित दलित पँथरच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.

मुंबई  : दलित पँथरच्या अनेक कार्यकर्त्यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'आगीतून येऊन फुफाटयात पडलो, अशी वेळ कोणावरही येऊ देणार नाही,' असा विश्वास दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित दलित पँथरच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सुखदेव सोनवणे यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश झाला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,  युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, शुभम सोनवणे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी अनेक पदाधिकारी व नेते पुढाकार घेत आहेत. जातीयवादाचा स्पर्श नसलेली पुढची पिढी पक्षात यायला हवी. आपला पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांचा आहे. इथे आपल्याला सन्मानाची वागणूक दिली जाईल. आगीतून येऊन फुफाटयात पडलो अशी वेळ कोणावरही येऊ देणार नाही, असा विश्वास अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

अजित पवारांनी शिवेंद्रराजेंना सुनावले!

'माझी वाट लागली तरी चालेल पण समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसत नाही,' अशी जाहीर धमकी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिली आहे. या धमकीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवेंद्रराजेंना सुनावले आहे. 'कार्यकर्त्यांना जवळ ठेवण्यासाठी कोणी काही बोलत असतात , पण त्याला घाबरण्याचे कारण नाही,' अशी प्रतिक्रिया पवारांनी शिवेंद्रराजेंच्या वक्तव्यावर दिली. 

जावळी तालुक्यातील कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली. 'मी उदयनराजे भोसले यांना पराभूत केलेला आमदार असून मी कुरघोड्या करत नाही. शशिकांत शिंदेंच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका. तसा कोणताही प्रयत्न मी केलेला नाही. माझी वाट लागली तरी चालेल पण समोरच्याची वाट लावल्याशिवाय मी गप्प बसत नाही, असा इशारा शिवेंद्रराजेंनी दिला आहे. 

मुंबईत माध्यमांशी बोलताना पवार यांनी शिवेंद्रराजे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, 'राजकारणात कोणी कोणाला धमकी देण्यात अर्थ नसतो. कार्यकर्त्यांना जवळ ठेवण्यासाठी कोणी काही बोलत असतात. पण त्याला घाबरण्याचे कारण नाही.'

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख