खासदार डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल...

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडले होते.
Mohan Delkar 10.jpg
Mohan Delkar 10.jpg

मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली होती. मोहन डेलकर यांच्या  मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारीमध्ये डेलकर मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडले होते. 

डेलकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर 15 पानांची सुसाईट लिहिली होती. तपासणीतही ते देलकर यांचेच हस्ताक्षर असल्याचे निष्पन्न झाले आहे. डेलकर यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांचे हस्ताक्षर ओळखले आहे. 

हस्ताक्षर तज्ज्ञांच्या मदतीनेही पडताळणी करण्यात आली. त्यात सुसाईड नोटमधील हस्ताक्षर त्यांचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने डेलकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यातही ती आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. अद्याप मुख्य अहवाल येणे बाकी आहे. 

कुटुंबीयांच्या फिर्यादी नंतर याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अनेक स्थानिक कार्यक्रमात त्यांना बोलवले जात नव्हते, 

मोहन डेलकर यांना वेळोवेळी अपमानीत केले जात होते.याबाबत त्यांनी संसदेत आवाज उठवला होता. यावेळी काही स्थानिक अधिकाऱ्यांवर त्यांनी आरोप केला होता.या संदर्भात त्यांनी नितीश कुमार यांची भेटही घेतली होती. यावर  एक समिती स्थापन केली होती. मात्र, त्या पूर्वीच मोहन यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी देलकर यांनी 15 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. गुजराती भाषेत ही सुसाईड नोट लिहिली होती.

सातवेळा खासदार असणा-या मोहन डेलकर यांना इतके असहाय आणि विवश व्हावे लागले की त्यांनी आपले जीवनच संपवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षापासून आपल्यावरील प्रचंड मोठ्या दबावाची आणि छळवणुकीची गाथा त्यांनी स्वतःच व्हिडीओद्वारे तसेच संसदेमध्ये भाषणातूनही मांडली होती. त्यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात भाजप नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला होता तसेच त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपचे गुजरातचे माजी मंत्री आणि सध्याचे दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले आहे. यातूनच भाजपच्या त्रासाला कंटाळून खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली असावी, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.   

मृत्यूनंतर तरी न्याय मिळावा, म्हणून डेलकरांची मुंबईत येऊन आत्महत्या केली असून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने डेलकरांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून डेलकर कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. डेलकर यांच्या आत्महत्याप्रकरणी भाजपच्या भूमिकेची चौकशी करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला ऑनलाईन मिटींगमध्ये दिले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com