उद्योग सुरु होण्याचे चक्र थंडावले...

मे महिन्यात आशादायक परिस्थिती निर्माण होऊनही त्यानंतर दोन महिन्यांत परिस्थितीत वेगवान फरक पडला नसल्याचे चित्र सध्या आहे. तर सूक्ष्म व लघु उद्योग मोठ्या संख्येने सुरु झाले असावेत, असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
2Subhash_Desai_18
2Subhash_Desai_18

मुंबई : राज्य सरकारने कारखाने सुरु करण्यास 20 एप्रिल रोजी परवानगी दिल्यावर 15 मे पर्यंत राज्यात लहानमोठे सुमारे 40 हजार उद्योग सुरु झाले होते. त्यात अंदाजे 11 लाख कामगार काम करू लागल्याची माहिती देसाई तसेच विभागाचे प्रधानसचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी त्यावेळी दिली होती. त्यानंतर आजपर्यंत राज्यात एकूण 70 हजार लहानमोठे उद्योग सुरु झाले आहेत. त्यात साडेसोळा लाख कामगार कामावर आल्याचे देसाई यांनी सांगितले. 

अजूनही उद्योग सुरु होण्यात अनंत अडचणी आहेत. सूक्ष्म व लघु उद्योग मोठ्या संख्येने सुरु झाले असतील, मात्र त्यांचा नेमका तपशील आता विभागाकडे नाही, असेही ते म्हणाले.राज्याचे आर्थिक चक्र थंडावू नये म्हणून राज्य सरकारने एप्रिल महिन्याअखेरीस कारखाने सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली. मे महिन्यात आशादायक परिस्थिती निर्माण होऊनही त्यानंतर दोन महिन्यांत परिस्थितीत वेगवान फरक पडला नसल्याचे चित्र सध्या आहे. तर सूक्ष्म व लघु उद्योग मोठ्या संख्येने सुरु झाले असावेत, असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.

देशातही रोगाचा फैलाव वाढतो आहे व अशा स्थितीत उद्योगांची परिस्थिती केव्हा सुरळीत होईल हे सांगणे कठीण आहे. कोरोनाचा फैलाव थांबला तर सर्वकाही आलबेल होईल. कोरोना व त्यामुळे लोकांच्या मनातील भीती यामुळे चक्र मंदावले आहे. मात्र, उद्या लोकांनी अशाच अवस्थेत जरूर ती काळजी घेत कामे सुरु केली तर चित्र पालटेलही. मात्र असा काही सामूहिक निर्णय होईल का, हे आपण सांगू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

सत्तर हजार कारखानदारांनी उद्योग विभागाच्या यंत्रणेत संमती मागितली होती. मात्र, आमच्या संमतीच्या अटीची गरज नसणारे लघू व सूक्ष्म उद्योग मोठ्या संख्येने सुरु झाले असतील. कामगारांची कमतरता, कच्च्या मालाचा अभाव, अद्यापही बऱ्याच ठिकाणी सुरु असलेला लॉकडाउन व त्यामुळे वाहतुकीत येणारे अडथळे या मुख्य अडचणींमुळे कारखाने काम सुरु करण्याच्या अवस्थेत नाहीत. मुंबई-ठाण्यात अद्यापही लॉकडाऊन आहे, जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, मात्र याही अडचणींवर मार्ग काढून काम सुरु आहे. राज्यात परिस्थिती सुरळीत नाही, कारण रोगाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढतो आहे व त्याचा फटका उद्योगांना बसतो आहे, असेही देसाई यांनी दाखवून दिले.


हेही वाचा : शेतकऱ्यांना दिवसा-रात्री वीज उपलब्ध करुन द्या.. 

मुंबई : कोल्हापूर येथील वीजग्राहक आणि विविध औद्यागिक संघटनांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीसोबत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन त्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. कोल्हापूर जिल्ह्यातील वीजग्राहकांच्या मागण्या व प्रलंबित मुद्दे याबाबत लवकरच संबंधितांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. सध्याची परिस्थिती ध्यानात घेऊन वीजबिलात सवलती मिळाव्यात तसेच शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्रीही वीजपुरवठा व्हावा अशा मुख्य मागण्या करण्यात आल्या.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com