एसटीच्या आसनांच्या मध्ये बसवणार पडदे

लॉकडाऊन काळात एसटी तब्बल पाच महिने बंद असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच राज्य सरकारकडून ही ठोस अशी मदत मिळाली नसल्याने अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे. त्यातच एसटीची सेवा पुर्ववत होत नाही. त्यामुळे भविष्यात एसटी १०० टक्के आसन क्षमतेवर चालवण्याच्या दृष्ट्रीने एसटी महामंडळ पाऊले उचलत असल्याचे दिसून येत आहे.
State Transport Buses Maharashtra
State Transport Buses Maharashtra

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंद असलेली एसटीची सेवा २० ऑगष्ट पासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, ५० टक्केच प्रवासी वाहतूक सुरू असल्याने एसटीच्या उत्पन्नावर प्रचंड परिणाम होत आहे. त्यामूळे भविष्यात एसटीची १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्ट्रीने एसटीने बसेसमधील आसनांमध्ये पडदे लावण्याचा प्रयोग केला असून, राज्य शासनाच्या परवानगीनंतरच महामंडळातील इतर महत्वांच्या विभागामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

लॉकडाऊन काळात एसटी तब्बल पाच महिने बंद असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच राज्य सरकारकडून ही ठोस अशी मदत मिळाली नसल्याने अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे. त्यातच एसटीची सेवा पुर्ववत होत नाही. त्यामुळे भविष्यात एसटी १०० टक्के आसन क्षमतेवर चालवण्याच्या दृष्ट्रीने एसटी महामंडळ पाऊले उचलत असल्याचे दिसून येत आहे.

त्यासाठी एसटीच्या आसनावरील मधात आता पडदे बसविण्यात येणार आहेत. सध्या मुंबई, पुण्यातील अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या बस मध्ये हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यानंतर याला एसटी महामंडळाची तांत्रीक आणि राज्य सरकारची मान्यता मिळाल्यास, राज्यभरातील विभागांमध्ये हा प्रयोगाची अमंलबजावणी करण्यात येणार आहे.

पाच महिन्यात साडेतीन हजार कोटीचा तोटा
कोरोनामूळे २२ मार्च पासून एसटीची सेवा बंद आहे. त्यामूळे दैनंदिन सुमारे २२ कोटी रूपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागत आहे. त्यामूळे सुमारे १५० दिवसांचा साडेतीन हजार कोटी पेक्षा जास्त तोटा झाल्यामुळे एसटीला घरघर लागली आहे.

देखभालीचे काय ?
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रेल्वेने त्यांच्या एससी कोच मधील ब्लॅंकेट, चादर, उशी आणि टॉवेल आदी सुविधा सध्या बंद केल्या आहे. कोरोना काळानंतर सुद्धा या सुविधा नियमीत बंद ठेवण्यासाठी रेल्वेच्या विचारधीन आहे. त्याशिवाय सध्याच्या परिस्थितीत रेल्वे कोच मधील खिडक्‍यांचे पडदे सुद्धा काढले आहे. तर, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बेस्ट, रिक्षामध्ये प्रवासी व चालकांच्या मध्ये प्लास्टिक शिट्‌स बसविले जात असताना एसटीत पडदे बसविले जाणार आहेत. त्यामुळे प्लास्टिक ऐवजी पडदे लावल्यास देखभालीचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या पडदे लावलेल्या बसेस अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावणाऱ्या बसेसमध्ये प्रायोगीक तत्वावर प्रयोग केला जात आहे. त्यानंतर एसटी महामंडळातील तांत्रीक मान्यता आणि राज्य सरकारच्या मान्यतेनंतर याची एसटी महामंडळात अंमलबजावणी केली जाणार आहे.
- राहूल तोरो, महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ
Edited By- Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com