‘शटअप या कुणाल’ मध्ये संजय राऊत करणार गैाप्यस्फोट..?

संजय राऊत हे आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर देऊन राजकीय क्षेत्रात काय गैाप्यस्फोट करणार हे ‘शटअप या कुणाल’ मधून लवकरच स्पष्ट होईल.
collage (13).jpg
collage (13).jpg

मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याचे निमंत्रण स्वीकारलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेत संजय राऊत यांची महत्वाची भूमिका आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत, अभिनेत्री कंगना राणावत, अभिनेत्री रिया चक्रवती आदी विषयावर संजय राऊत काय बोलणार, याविषयी उत्सुकता आहे. प्रसारमाध्यमांमध्ये सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेले खासदार संजय राऊत यांना कुणाल कोणते प्रश्न विचारणार, त्याला संजय राऊत हे आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर देऊन राजकीय क्षेत्रात काय गैाप्यस्फोट करणार हे ‘शटअप या कुणाल’ मधून लवकरच स्पष्ट होईल. 

‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून संजय राऊत सरांनी पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी पुन्हा सुरु करेन, अन्यथा कुणालाही संधी नाही’ असं ट्वीट कुणाल कामरानं नुकतचं केलं होत. यानंतर राऊत आणि कुणाल कामरा यांच्यात फोनवर बोलणं झालं आहे. मुंबईत खारमधील स्टुडिओमध्ये येत्या रविवारी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्ट मुलाखतीचे चित्रीकरण होणार आहे. 

कुणाल कामराने याआधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘शट अप या कुणाल’साठी निमंत्रण दिले होते. याबाबत कुणालने काही महिन्यांपूर्वी ट्वीट केले होते. नेटिझन्समध्ये ‘शट अप या कुणाल’ हा कुणाल कामराच्या मुलाखतींचा कार्यक्रम लोकप्रिय आहे.

कुणाल कामराने यूट्यूबवर 2017 मध्ये हा कार्यक्रम सुरु केला होता. आतापर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी, जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, गीतकार जावेद अख्तर,  काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सुर्या, मधुकिश्वर देसाई आदी नेते सहभागी झाले आहेत.

Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com