मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल..आयोजक आक्रमक - Crimes filed against the organizers of Maratha Kranti Morcha  Organizers are aggressive | Politics Marathi News - Sarkarnama

मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल..आयोजक आक्रमक

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

तुळजापूर पोलिसांनी मोर्चाचे आयोजन कऱणाऱया सात आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे.

तुळजापूर : मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या तिसऱ्या पर्वाला दोन दिवसापूर्वी  सुरूवात झाली होती. 

तुळजापूर पोलिसांनी मोर्चाचे आयोजन कऱणाऱया सात आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता राज्यभर त्याचे पडसाद उमटण्याची भीती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे सकल मराठा समाजातील आयोजक आक्रमक झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावणे, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवण्याची कारण देत मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या तिसऱ्या पर्वाला सुरूवात झाली होती. यावेळी छत्रपती संभाजी राजे म्हणाले की मराठा समाजासाठी आंदोलन करताना संयम पाळा. आम्हाला दिल्लीला पाठवू नका. आम्ही आमच्या बळावर दिल्ली काबीज करू शकतो मी कोणत्याही पक्षाचा खासदार नाही, राष्ट्रपती नियुक्ती खासदार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर हजारोंचे मोर्च लाखोंमध्ये बदलायला वेळ लागणार नाही. राज्य सरकार बार्टी सारखी संस्था चालवू शकते, मग सारथी संस्था का नाही चालवू शकत, असा प्रश्न संभाजीराजेंनी यावेळी उपस्थित केला. 
 

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाअध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी मराठा आरक्षणाबाबत नुकतेच व्यक्तव्य केलं होतं. गायकवाड म्हणाले होते की संभाजीराजेंना आरक्षण मागण्याचा नैतिक अधिकार नाही. याबाबत संभाजीराजेंनी प्रवीण गायकवाड यांचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. मराठा समाजात दोन गट पडणाऱ्यांना हाणून पाडा, असे संभाजीराजे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीची परीक्षा दोन महिने पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचविणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. 

मराठा समाजाच्या मांडीला मांडी लावून मी बसलोय.. अन् तोच माझा राजवाडा आहे. अनेक नेते मंडळी टीव्ही वर बोलतात टीवटीव् करतात, धाडस असलं तर नागरिकांमध्ये या, असा टोला छत्रपती संभाजीराजे यांनी नाव न घेता आमदार विनायक मेटे यांना लगावला आहे. संभाजीराजेंनी प्रवीण गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्ष त्यांनी टोला लगावला. मराठा समाजात दोन गट पडणाऱ्यांना हाणून पाडा, असे संभाजीराजे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख