'आर्ची'मुळे 'सैराट' झालेल्या सहा जणांवर गुन्हा.. - Crime against six people who became Sairat due to Archie corona | Politics Marathi News - Sarkarnama

'आर्ची'मुळे 'सैराट' झालेल्या सहा जणांवर गुन्हा..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

लेंगी महोत्सवात अक्षरशः झुंबड उडाली होती. आयोजकांनाही रिंकूच्या सुरक्षेसाठी अधिक धावपळ करावी लागली.

नांदेड : नांदेडमध्ये 'आर्ची'ला कार्यक्रमाला बोलावणं संयोजकाला चांगलचं महाग पडलयं. संयोजकांच्या विरोधात कोव्हीड 19 च्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनवट तालुक्यातील सारखणी इथं 16 फेब्रुवारीला संत सेवालाल जयंती निमित्त आयोजित लेंगी स्पर्धैसाठी 'सैराट' फेम 'आर्ची' उर्फ रिंकु राजगुरूला निमंत्रित करण्यात आलं होतं. 

रिंकुला पाहण्यासाठी कार्यक्रमाला गर्दी जमली होती. तिला पाहण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची सगळी बंधने झुगारून गर्दी केली. लेंगी महोत्सवात अक्षरशः झुंबड उडाली होती. आयोजकांनाही रिंकूच्या सुरक्षेसाठी अधिक धावपळ करावी लागली. कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. या प्रकरणी संयोजक विशाल जाधवसह 6 जणांच्याविरोधात सिंदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिंकू ही 'हण्ड्रेड' या हिंदी वेब सीरिजनंतर आता अॅमेझॉन प्राइमवरील 'अनपॉज्ड' या सिनेमात दिसली आहे. राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या महरातो यांनी एकत्रितपणे 'अनपॉज्ड' सिनेमा बनवला आहे. यात पाच लघुपट एकत्रित आणण्यात आले आहेत.

'अनपॉज्ड' चित्रपट १८ डिसेंबरला प्रदर्शित झाला. यात 'ग्लिच', 'अपार्टमेंट', 'रॅट-ए-टॅट', 'विषाणू' आणि 'चाँद मुबारक' लघुपटांचा समावेश आहे. यातील 'रॅट ए टॅट' या लघुपटात रिंकू राजगुरूची भूमिका होती. याचं दिग्दर्शन लिलेट दुबेनं केलं असून रिंकूशिवाय तनिष्ठा चॅटर्जीदेखील यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्याचे धोक्याचे इशारे खरे ठरले... 

मुंबई  : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने आपण निघालो आहोत काय? अशी भीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार स्पष्ट केले आहे, पुन्हा लॉक डाऊन नको असेल तर नियमांचे काटेकोर पालन करा! पण लोक बेपर्वा होऊन गर्दी करीत आहेत, मास्क न लावता वावरत आहेत, उत्सव साजरे करीत आहेत. बंगालातील जाहीर कार्यक्रमांत गृहमंत्री व त्यांचे सहकारी ‘मास्क’ न लावता किंवा ‘मास्क’ नाकाखाली ओढून ममतादीदींवर हल्ला करताहेत. अशात कोरोनाच्या विषाणूने त्यांना दगाफटका केला तर कसे व्हायचे? असा सवाल शिवनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी वारंवार जे धोक्याचे इशारे दिले ते खरे ठरले आहेत. ‘हे उघडा आणि ते उघडा, नाहीतर आंदोलने करू,’ अशा धमक्या विरोधक देत राहिले, कोरोना नियमांचेही राजकारण केले गेले. त्याचा फटका जनतेला व राज्याला बसत आहे.

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख