हिवाळी अधिवेशनाबाबत सरकारचा पळ ..प्रवीण दरेकरांची टीका - Concerning the winter session Opposition leader Praveen Darekar's criticism | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

हिवाळी अधिवेशनाबाबत सरकारचा पळ ..प्रवीण दरेकरांची टीका

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

अधिवेशनाच्या तारखा तसेच ठिकाण याबाबत अजूनही अनिश्चितता असून यासंदर्भात वेगवेगळी विधाने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी  टीका केली आहे. 

मुंबई  : "कोरोनाचे कारण देऊन विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न असून हे सरकार हिवाळी अधिवेशनापासून पळ काढत आहे," अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

अधिवेशनाच्या तारखा तसेच ठिकाण याबाबत अजूनही अनिश्चितता असून यासंदर्भात वेगवेगळी विधाने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी ही टीका केली आहे. 

महाराष्ट्रात उद्योगधंदे बंद पडले आहेत, बेरोजगारीचा विषय वाढत आहे, अन्य कित्येक समस्या आ वासून उभ्या आहेत. अशा या सगळ्या विषयांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील जनता विधीमंडळ अधिवेशनाची वाट पाहत आहे. पण या अधिवेशनापासून पळ काढण्याची भूमिका या सरकारची दिसते आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशाचा कालावधी ठरवू असे सरकार आधी सांगत होते. मात्र हेच सरकार आता अधिवेशनापासून पळ काढण्यासाठी कोरोनाचा आधार घेत हे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका दरेकर यांनी केली. 

एसटीचे भवितव्य काय

कोकणातील निसर्ग वादळाच्याबाबतीत सरकारने जी मदत जाहीर केली आहे, ती अजूनही कोकणवासियांना पूर्ण मिळालेली नाही. त्यामुळे सरकारच्या फक्त घोषणाच होत आहेत, प्रत्यक्षात काहीच कृती होत नाही. एसटीच्या बाबतीतही तसेच होत आहे, असेही दरेकर यांनी दाखवून दिले. एसटीची सध्याची अवस्था कठिण असतानाही परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचा-यांना दोन महिन्याचा पगार दिला. पण दोन महिन्यांच्या पगाराने हा प्रश्न सुटणार नाही. आजचे मरण दोन महिन्यांनी पुढे ढकलले गेले आहे. दोन महिन्यानंतर एसटीचं भवितव्य काय, याचाही आघाडी सरकारने विचार करावा, असेही त्यांनी नमुद केले.

संजय राऊत यांची भूमिका दुटप्पी

बिहारमध्ये नितीश कुमार यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असताना ते मुख्यमंत्री झाले तर तो बिहारच्या जनादेशाचा अपमान होईल, असे म्हणणाऱ्या शिवसेनानेते संजय राऊत यांची भूमिका दुटप्पी आहे. कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा पहिल्या क्रमांकावर होता व शिवसेना तिसर्‍या क्रमांकावर होती. तरीही महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान झाला नाही का. शिवसेना व भाजपची युती असताना कमी जागा मिळूनही महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा जनतेचा अपमान झाला नाही का. त्यामुळे आता नितीशकुमार मुख्यमंत्री झाले तर तो बिहारी जनादेशाचा अपमान होईल, असे सांगणाऱ्या राऊत यांची व शिवसेनेची भूमिका दुटप्पी आणि सोयीची असल्याची टिकाही दरेकर केली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख