एल्गार परिषदेला परवानगी, मग शिवजयंतीला का नाही... - cm uddhav thackeray shivaji jayanti allow shiv jayanti celebrations or else intense agitation warnsletter bjp mla ram kadam | Politics Marathi News - Sarkarnama

एल्गार परिषदेला परवानगी, मग शिवजयंतीला का नाही...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

भाजपचे नेते राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.  

मुंबई :  यंदा शिवजयंतीवर कोरोनाचं सावट आहे. गृहमंत्र्यालयानं काढलेल्या आदेशामुळे शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप नेते आक्रमण झाले आहेत. 

दोन दिवसापासून राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. यामुळे राज्य सरकारनं नवा आदेश काढून शिवजयंती साजरी करण्यावर काही नियम व अटी घातल्या आहेत. यावर भाजपचे नेते राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.  

शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, असा इशारा राम कदम यांनी सरकारला दिला आहे. एल्गार परिषदेचा परवानगी मग शिवजयंतीला का नाही, असा सवाल कदम यांनी राज्य सरकारला केला आहे. याबाबत राम कदम यांनी टि्वट करीत राज्य सरकारला जाब विचारला आहे. 

'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी नाही ? शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय ही शरमेची गोष्ट आहे. आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का,' असं टि्वट कदम यांनी केलं आहे.  

राम कदम म्हणाले की, काही दिवसात सातत्याने महाराष्ट्रात हिंदूंची गळचेपी होताना दिसते. पालघरमध्ये साधूंवर हल्ला झाला. मात्र राज्य सरकारने ठोस कारवाई केली नाही. तांडव या वेबसीरिजच्या माध्यमातून हिंदू देवदेवतांचा अवमान केला. तरीही सरकार गप्प बसलं आहे. आता तर शिवजयंती साजरी करण्यावर निर्बध घालून पुन्हा एकदा हिंदूंचा अवमान करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या पत्राद्वारे माझी तुम्हाला विनंती आहे की, शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख