मुख्यमंत्र्यांनी पुण्याला पाचशे कोटी द्यावे..

पुण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाचशे कोटी रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.
3Jagdish_20Mulik.jpg
3Jagdish_20Mulik.jpg

पुणे : कोरोना संकटाच्या तब्बल साडेचार महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे भेटीवर आले आहेत. विभागीय आढावा बैठक घेण्यासाठी ते पुण्यात आले आहेत. संकटात सापडलेल्या पुण्याला मुख्यमंत्री काय मदत करतात याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. पुण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाचशे कोटी रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. त्यामुळे पुण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे काय मदत जाहीर करतात याबाबत उत्सुकता आहे.


नाशिक, अलिबाग व आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरचा अपवाद वगळता गेल्या साडेचार महिन्यात मुख्यमंत्री ठाकरे मुंबई बाहेर पडले नाहीत. राज्यात कारोनाचे संकट असताना मुख्यमंत्र्यांनी किमान विभागीय पातळीवर बैठका घेऊन कोरोना संकटाचा आढावा घ्यावा, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी मुबंई बाहेर जाण्याचे टाळले होते. या संदर्भात चर्चा होऊ लागल्यानंतर पुण्यातील आजची आढावा बैठक होत असून पुढील काही दिवसात इतर विभागातदेखील भेट देऊन मुख्यमंत्री आढावा घेतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यात कोरोनाच्या एक्टीव्ह रूग्णांची संख्या जवळपास २० हजार झाली आहे. रोज ही संख्या वाढत आहे. गेल्या साडेचार महिन्यात जवळपास अडीच लाख रूग्णांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली आहे. क्वारंटाइन करण्यात आलेल्या नागरीकांची संख्यादेखील मोठी आहे. गेल्या चार महिन्यात कोरोनाचा अटकाव करण्यासाठी पुणे महापलिकेते सुमारे अडीचशे कोटी रूपये खर्च केल्याचे सांगण्यात येत आहे.

या पाशवर््भूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुणेकरांसाठी किमान पाचशे कोटी रूपये मदत म्हणून द्यावेत, अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. अनेक प्रयत्नांनंतरदेखील पुण्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात येत नाही. त्यामुळे पुण्यात आणखी कोवीड रूग्णालये तसेच इतर सुविधा उभारण्याची गरज आहे. त्यासाठी मोठ्या निधीची गरज असून राज्य सरकारने यासाठी मदत करावी, ही मागणी गेल्या तीन महिन्यात भाजपाकडून सातत्याने करण्यात आली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या या मागणीला मुख्यमंत्री ठाकरे काय प्रतिसाद देतात, हे काही तासातच स्पष्ट होणार आहे.
 Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com