संजय राऊतांच्या जवळच्या नातेवाईकाला ईडीची नोटीस : या नेत्याची खळबळजनक माहिती

ईडीने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ घातला आहे...
nitesh rane-raut
nitesh rane-raut

हिंगोली : ईडीकडे पुरावे असतील, म्हणून त्यांनी कारवाई सुरू केली आहे. ते उगीच कोणालाही कसे ताब्यात घेतील. यामध्ये शिवसेना नेतेत संजय राऊत यांची तडफड कशासाठी आहे? त्यांच्या नातेवाईकांना काही नोटीस आली का, असे असेल, तर त्यांनी सांगावे, असा टोला भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

हिंगोली येथे पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. ते म्हणाले, की केंद्रीय तपास करणाऱ्या एजन्सी ईडी असेल किंवा सीबीआय असेल, त्यांच्याकडे काही पुरावे सापडले असतील. काही अनधिकृत गोष्टी सापडल्यामुळेच ते कारवाई करतात. त्यांना संजय राऊत आवडत नाही म्हणून ते कारवाई करीत नाहीत. संजय राऊत यांनी हेही सांगावे, त्यांना स्वतःला कुठली नोटीस मिळाली का, त्यांच्या नातेवाईकांना अशा पद्धतीची नोटीस मिळाली का, याबाबत त्यांनी सांगावं. आम्हाला अशी बाहेरून माहिती मिळाली, की त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना नोटीस मिळाली आहे, त्यामुळेच ते तडफडत आहेत का, कदाचित ते याच कारणाने भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यास गेले होती की काय, असा संशय वाटत आहे, असे मत राणे यांनी व्यक्त केले.


महाराष्ट्रात शिवसेनेच्या एका आमदारावर ईडीने कारवाई केली. शिवसेनेच्या नेत्यावर झालेली ही कारवाई शिवसेनेने प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळेच खासदार राऊत यांनी ईडीबाबत काही वक्तव्य केले होते. त्याबाबत बोलताना राणे यांनी राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. कोणतीही केंद्रीय एजन्सी कारवाई करताना आधी बऱ्यापैकी पुरावे जमा करते. त्याआधारेच मोठ्या कारवाया होत असतात. ही केंद्राची एजन्सी आहे, म्हणून त्यांच्यावर काहीही आरोप करणे हे राज्यातील नेत्यांच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मत त्यांनी पत्रकार परषदेत मांडले. राऊत यांच्या एका नातेवाईकाला ईडीची नोटीस आली असून, त्यामुळेच ते तडफडत आहेत, असे मत राणे यांनी व्यक्त करून नवीन वाद सुरू केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com