The Chief Minister said, "Tear down the government..." | Sarkarnama

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,  "सरकार पाडा..."

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 जुलै 2020

"माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडा, " असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का म्हणाले, याबाबत आपल्याला उद्या त्यांच्या मुलाखतीतून समजणार आहे. 

पुणे : "मी साठ्याव्या वर्षी मुख्यमंत्री झालो असलो, तरी 'यासाठी केला होता अट्टाहास' असं नाही आहे,  हा योगायोग आहे. माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडा, " असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का म्हणाले, याबाबत आपल्याला उद्या त्यांच्या मुलाखतीतून समजणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत 'सामना'चे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा तिसरा प्रोमो आज प्रदर्शित करण्यात आला आहे. ही मुलाखत ता. २५ व २६ जुलै रोजी 'सामना'च्या वेबसाईटवरून (www.saamana.com) प्रसारीत करण्यात येणार आहे.  या मुलाखतीत राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विविध प्रश्न विचारलेले दिसतात. 

सध्याचं सरकार तीन चाकी रिक्षाचे सरकार आहे, असे विरोधक का म्हणतात,  या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात,  " शेवटी केंद्र सरकारमध्ये  किती चाके आहेत."  राष्ट्रीय राजकारणाकडे सध्या तुम्ही कोणत्या दृष्टीने तुम्ही पाहता, यावर ठाकरे म्हणतात, "आता चीन तुम्हाला नको आहे, कालांतराने हिंदी-चीनी भाई-भाई होणार नाही का" ?

एका प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणतात की राष्ट्रभक्ती सगळ्या देशाची सारखी असली पाहिजे, माझी आहे. तसेच मी निराशावादी नाही, मी कोणालाही निराशावादी होऊ देणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील उद्योगक्षेत्राबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणतात की  धोरणाची अनिश्तितता असेल तर गुंतवणुक येणार नाही. 

राज्यात स्थापन झालेली महाविकास आघाडी काय म्हणते, या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आज समजणार आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॅान मुलाखत संजय राऊत यांनी घेतली होती. या मुलाखतीत पवार यांनी महाविकास आघाडीची स्थापना, भाजपची भूमिका, सध्याच्या महाविकास आघाडीचे हेडमास्तर कोण आहे, अशा विविध प्रश्नांची सडेतोड व परखड उत्तरे दिली होती. या मुलाखतीत अनेक गोप्यस्फोट पवार यांनी केले होते. आता मुख्यमंत्री ठाकरे आपल्या मुलाखतीत काय सांगतात, हे आपल्याला  २५ व २६ तारखेला समजणार आहे.  
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख