मुख्यमंत्री म्हणाले, ''शिवाजीराव आता तरी काळजी घ्या..'' 

शिवाजीराव आढळराव यांच्या सिक्यूरीटी गार्डला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दक्षता म्हणून आढळराव यांनीही स्वत:सह जवळच्या सर्व सहका-यांचे स्वॅब तपासणी करणार आहेत.
Adhalrao Patil.jpg
Adhalrao Patil.jpg

शिक्रापूर : शिरुर लोकसभा मतदार संघात अनेक ठिकाणी भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या उत्साह वाढविणारे शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या सिक्यूरीटी गार्डला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दक्षता म्हणून आढळराव यांनीही स्वत:सह जवळच्या सर्व सहका-यांचे स्वॅब तपासणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना काळजी घेण्यास सांगितले आहे. 'शिवाजीराव आता तरी काळजी घ्या..’ अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी त्यांना केली आहे. 
        
मार्चच्या मध्यवधीत कोरोनाचा प्रवेश जिल्ह्यात झाला. लॉकडाउन झाल्यामुळे हैराण अनेक मोठी गावे, आरोग्य सुविधांबाबत प्रशासनाला सहकार्य, कार्यकर्त्यांच्या उत्साह वाढविण्याच्या उपाययोजना यामुळे आढळराव-पाटील ऐन कोरोनाकाळात शिरुर लोकसभा मतदार संघातील बहुतेक सर्वच मोठ्या आणि मध्यम गावांमध्ये स्वत: दौरा करुन फिरत होते. आजही तितकेच सक्रीय आहेत. या काळात काही आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांना एन-१९ मास्क, साधे मास्क, सॅनिटायझर, टेंपरेचर टेस्टींग किट आदी त्यांनी स्वत:हून पोहचवले. 

या शिवाय पुणे-नाशिक फास्टट्रॅक रेल्वे प्रकल्प, पीएमआरडीएच्या विविध बैठका, त्यांच्या कारवाया आणि २५ हजार कुटुंबीयांच्या बेकायदा बांधकामांच्या नोटीशीबाबतच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपूरावा, जिल्हा परिषदेशी संबंधित मतदार संघातील कामांबाबत पाठपूरावा, अशा अनेक प्रश्नांबाबत लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे राहून सजग राहणा-या आढळरावांना आता होम क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. कारण त्यांचा पिंपरी-चिंचवड भागात राहणारा एक सुरक्षा रक्षक कोरोनाबाधित झाल्याचा रिपोर्ट आला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वत: आढळराव यांनी स्वत:चा स्वॅब आरोग्य विभागाला देण्याबाबत सुचित केले आहे. या स्वॅबचा रिपोर्ट आल्यानंतर आढळरावांबाबत नेमके काय ते समजणार आहे्. मुख्यमंत्र्यांनी 'शिवाजीराव आता तरी काळजी घ्या..’ अशी सूचना केल्याची माहिती जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी दिली.   
Edited  by : Mangesh Mahale

हेही वाचा: ''हो, मी पुन्हा येईल..'' घोषणेचं झालं हासं... 

पुणे : ‘मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन. हा चेष्टेचाही विषय झाला. कुठल्याही राज्यकर्त्याने, राजकीय नेत्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहीत धरायचं नसतं. अशा गृहीत धरण्यात थोडासा दर्प आहे, अशा प्रकारची भावना लोकांच्यात झाली आणि यांना धडा शिकवला पाहिजे हा विचार लोकांच्यात पसरला. कुठल्याही लोकशाहीतला नेता आपण अमरपट्टा घेऊन आलोय असा विचार करू शकत नाही. या देशातल्या मतदारांना गृहीत धरले तर तो कधी सहन करत नाही, असे राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले. ही मुलाखत 'सामना'तून प्रसिद्ध करण्यात आली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com