चंद्रकांतदादा अगोदर भाजपच्या त्या नगरसेवकांचे राजीनामे घ्या ! शिवसेनेचे आव्हान - Chandrakantdada should first resign those BJP corporators! Shiv Sena's challenge | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

चंद्रकांतदादा अगोदर भाजपच्या त्या नगरसेवकांचे राजीनामे घ्या ! शिवसेनेचे आव्हान

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राजीनामा देण्याची मागणी श्रीमती ठाकूर यांना करीत आहेत

जळगाव : कॉंग्रेसच्या नेत्या व राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने त्यांनी राजीमाना द्यावा असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.आहे.

मात्र या अगोदर त्यांनी घरकुल घोटाळ्यात न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या जळगावातील भाजपच्या नगरसेवकांचे राजीनामे घ्यावेत असे अवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. 

महापालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना एका प्रकरणात अमरावती जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

त्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राजीनामा देण्याची मागणी श्रीमती ठाकूर यांना करीत आहेत. मात्र न्यायालयाने शिक्षा ठोठावूनही जळगावातील भाजपच्या पाच नगरसेकांनी अद्यापही आपल्या पदाचे राजीनामे दिलेले नाहीत. 

जळगाव नगरपालका घरकुल घोटाळ्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे. मात्र या पाच नगरसेवकांनी अद्यापही आपल्या पदाचे राजीनामे दिलेले नाहीत. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील न्यायालयाने शिक्षा ठोठावली म्हणून यशोमती ठाकूर यांचा राजीनामा मागत आहेत. मग हाच नियम ते आपल्या पक्षातील नगरसेवकांना का लावत नाही असा प्रश्‍न उपस्थित करून महाजन यांनी म्हटले आहे,की आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहावयाचे वाकून अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका दिसत आहे. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी एक शिस्तप्रिय पक्ष अशी भाजपची ओळख निर्माण केली होती. मात्र ती आता कोठेही दिसून येत नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पटील यांनी प्रथम न्यायालयाने दोषी ठरविलेल्या जळगावातील आपल्या नगरसेवकांचे राजीनामे घ्यावेत त्यानंतरच श्रीमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी करावी असे आव्हानही महाजन यांनी दिले आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख