चंद्रकांतदादा म्हणतात, "" जयंतराव भाजप येणार आहे का ? याची मला काहीही माहिती नाही ! 

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आपला मतदानाचा हक्क बजावला.
चंद्रकांतदादा म्हणतात, "" जयंतराव भाजप येणार आहे का ? याची मला काहीही माहिती नाही ! 

कोल्हापूर : मी इतका सामान्य माणूस आहे, की वरच्यास्तरावर नक्की काय चर्चा चालतात याबद्दल मला काहीही माहिती नसतं असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. 

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. एका पत्रकारांने त्यांना विचारले, की जयंत पाटील खरंच भाजपच येणार आहेत का ? त्यावर त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. मी एक सामान्य कार्यकर्ता असल्याने मला उच्च स्तरावर काय चालते हे माहित नाही असे त्यांनी सांगितले. 

वास्तविक चंद्रकांतदादा आणि जयंत पाटील यांचे संबंध कसे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. दादांवर टीका करण्याची एकही संधी जयंतराव सोडत नाहीत. तसेच दादाही जयंतरावांचा आपल्या शैलीत समाचार घेत असतात. मध्यंतरी कोरोनाचे संकट असताना चंद्रकांतदादा ठाकरे सरकारला लक्ष्य करीत होते.

त्यावेळी जयंतरावांनी दादांवर खोचकपणे टीका करताना म्हटले होते, की साठ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ व्यक्तींनी घराबाहेर फिरायचे नसते. तसेच ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काही दिवसापूर्वी ठाकरे सरकारवर टीका करताना म्हटले होते,की जर राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आले नसते तर जयंतराव भाजपत दिसले असते. त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही झाली होती. 

हाच मुद्दा पुढे करून आज चंद्रकांतदादांना विचारले, की जयंतराव भाजपत येणार आहेत का ? यावर दादा म्हणाले, की मी सामान्य कार्यकर्ता आहे. वरिष्ठ पातळीवर काय घडते याची मला काहीही माहिती नाही. 

जयतं पाटील हे राष्ट्रवादीचे एक वजनदार नेते आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते आहेत. पक्ष वाढविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. पक्षानेही त्यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com