शेती नुकसानाची कामे मनरेगाच्या मार्फत करा.. नीलम गोऱ्हे यांची सरकारला सूचना  - Carry out agricultural damage works through MGNREGA  Neelam Gorhe suggestion to the government | Politics Marathi News - Sarkarnama

शेती नुकसानाची कामे मनरेगाच्या मार्फत करा.. नीलम गोऱ्हे यांची सरकारला सूचना 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

मनरेगाच्या अंतर्गत ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे  नुकसान झाले आहे. त्याठिकाणी कामे करण्यासाठी सूचना गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पुणे : महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे. यासंदर्भात महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बैठकीत मुद्दा उपस्थित केला. याबाबत लवकरच मदत फार गरजेची आहे, ज्या ठिकाणी घरात पाणी गेलेले आहे, अशा पुणे, कोल्हापूर आणि इतर ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे तेथे तयार जेवणाची मदत देण्यात यावी. पंचनामे तात्काळ करून पाऊस उसरल्यानंतर देखील पंचनामे सुरू ठेवून शेतकऱ्यांना, नागरिकांना जेवढी जास्त मदत करत येईल असे गोऱ्हे यांनी सुचवले. 

शिवाजीनगर येथील नाल्यात मोठ्याप्रमाणात पाणी वाढते आहे, याबाबत तो गोऱ्हे यांच्या बहीण जेलम जोशी यांनी चौकशी करण्यासाठी आपत्कालीन सेवेचा जो नंबर आहे त्यावर फोन लावला असता त्यांनी प्रथम ऐकून घेतले व नंतर फोन डिसकनेक्ट झाला. कोणताच प्रतिसाद आला नाही, नंतर क्रमांक बिझी होता. पुणे मनपा आपत्ती व्यवस्थापनाची बेफिकिरी याबद्दल गोऱ्हे यांनी पवार यांच्याकडे तक्रार करून यात सुधारणा करण्याची सूचना केली. 

मनरेगाच्या अंतर्गत ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याठिकाणी कामे करण्यासाठी सूचना गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मागील वर्षी सांगली, कोल्हापूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानाची कामे मनरेगाच्या अंतर्गत केल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला होता, असे देखील गोऱ्हे यांनी सांगितले. याबाबत तात्काळ आदेश द्यावा, अशी विनंती केली आहे.

हेही वाचा : शरद पवारांच्या दैाऱ्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा..
 
उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा अधिकृत दौरा जाहीर करण्यात आला आहे. 18 व 19 तारखेला जिल्ह्यातील तुळजापुर, उमरगा व परंडा तालुक्यातील गावांना भेटी देण्याचे नियोजन आहे. 

पवार हे तुळजापुर येथेच मुक्कामी राहणार असुन दौऱ्यामध्ये तुळजापुरला अधिक वेळ दिल्याचे दिसून येत आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जिल्ह्यामध्ये येत आहेत. शेतकरी या संकटामुळे पुरता कोसळला आहे. त्यावेळी पवार यांनी भेट देण्याचे नियोजन केल्याने शेतकरी वर्गालाही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी सध्या राज्याच्या सत्तेत अग्रभागी आहे, त्यातही पवार यांच्या शब्दाला या सरकारमध्ये सर्वाधिक किंमत असल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यांने निश्चितपणाने काही ना काही हाती लागल्याशिवाय राहणार, अशी भावना व्यक्त होत आहे. पवार देशाचे कृषीमंत्री होते, त्यावेळी गारपीठीने शेतकरी उध्द्वस्त झाला होता, तेव्हाही पवार पहाटेच चिखल तुडवित नुकसान झालेल्या पिकाचे पाहणी करत होते 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख