`लव्ह जिहाद`,चा कायदा आणणाऱ्या भाजपने आधी शाहनवाज, नक्वी यांना जेलमध्ये टाकावे..

देशाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या एखाद्या घटनेवरून देशभरातील मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारकडून होतो आहे. देशात कोरोना सारखे जागतिक संकट आहे, बेरोजगारीचा प्रश्न भंयकर बनला आहे, देशाची आर्थिकस्थिती मरणासन्न अवस्थेत आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी एका विशिष्ट समाजाला त्रास देण्याचा हेतून लव्ह जिहाद सारखे कायदे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
mp imtiaz jalil press conference news aurangabad
mp imtiaz jalil press conference news aurangabad

औरंगाबाद ः आधी मांस बंदी, नंतर ट्रीपल तलाख, मग एनआरसी आणि आता लव्ह जिहाद विरोधी कायदा आणून भाजप मुसलमानांना भिती घालण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आम्हाल जगणे मुश्कील होईल असा त्यांचा समज होता. पण या देशातील मुसलमान अशा कायद्यांना घाबरणार नाही, आमचे या देशावर प्रेम आहे आणि ते कायम राहील. लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिमांना लक्ष्य करू पाहणाऱ्या भाजपने या कायद्याची अंमलबजावणी म्हणून आपल्या पक्षातील शाहनवाज हुसैन, मुख्तार अब्बास नक्वी यांना आधी जेलमध्ये टाकावे आणि मग कायदा लागू करावा, असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून एमआयएमने उमेदवार दिला आहे. या संदर्पभात माहिती देण्यासाठी इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लव्ह जिहाद कायद्यासह अन्य मुद्यावर केंद्र सरकारवर टिका केली. तसेच विरोधी पक्षात असतांना मुस्लिम आरक्षणासाठी घसा कोरडा करणाऱ्या आमदार, मंत्र्यांनी आता सत्ता असतांना मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी आपल्या नेत्यांना जाब विचारावा, असा सल्लाही इम्तियाज यांनी दिला.

इम्तियाज जलील म्हणाले, पदवीधर मतदारसंघात आम्ही उमेदवार दिल्यावर पुन्हा आमच्यावर मतांचे धुव्रीकरण करण्यासाठी लढत आहात का? असा आरोप केला जात आहे. पण आमचा स्वतंत्र पक्ष आहे, आम्हाला निवडणूक लढवण्यासाठी सोनिया गांधी, शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांना विचारण्याची गरज नाही. या आधी आम्ही पदवीधरची निवडणूक लढवली नाही म्हणजे,आताही लढवू नये असे काही नाही. आमच्याकडेही उच्चशिक्षित आणि पदवीधरांसाठी काम करण्याची इच्छा असलेले तरुण आहेत. त्यासाठी आम्ही या निवडणूकीत ताकदीने उतरलो आहोत.

आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना या मोठ्या पक्षांचे बिहार विधानसभा निवडणुकीत काय हाल झाले हे आपण पाहिले. दुसरीकडे एमआयएमने मिळवलेले यश देखील सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे आम्ही लढावे की नाही या बाबत सल्ला देण्याचा प्रयत्न कुणी करू नये. शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण थांबवायचे असेल तर अशा निवडणुकांमध्ये तरुण, तडफदार, निष्कलंक लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि आमचा उमेदवार तसाच आहे, असेही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न..

देशाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या एखाद्या घटनेवरून देशभरातील मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारकडून होतो आहे. देशात कोरोना सारखे जागतिक संकट आहे, बेरोजगारीचा प्रश्न भंयकर बनला आहे, देशाची आर्थिकस्थिती मरणासन्न अवस्थेत आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी एका विशिष्ट समाजाला त्रास देण्याचा हेतून लव्ह जिहाद सारखे कायदे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

देशात या पुर्वी आसलेल्या सीआरपीसी, आयपीसी कायद्या अंतर्गत देखील कुणी जोर-जबरदस्तीने, एखाद्याच्या मनाविरुध्द लग्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते. पण त्याची अमंलबजावणी न करता नवे कायदे आणून मुस्लिमांना घाबरवण्याचा हा प्रयत्न आहे. पण आम्ही अशा कायद्यांना घाबरणार नाही. लव्ह जिहादच्या कायद्याची अंमलबजावणी भाजपला आधी आपल्याच पक्षापासून करावी लागेल. शाहनवाज हुसैन, मुख्तार अब्बास नक्वी या भाजपमध्ये मोठ्या पदावर असलेल्या नेत्यांना आधी या कायद्या अंतर्गत जेलमध्ये टाका, असे आव्हान इम्तियाज जलील यांनी भाजपला दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com