"आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री घरातून बाहेर पडणार : चंद्रकांत पाटील - BJP state president Chandrakant Patil target regarding CM | Politics Marathi News - Sarkarnama

"आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री घरातून बाहेर पडणार : चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

उद्धव ठाकरे उद्यापासून राज्याच्या दैाऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर निशाना साधला आहे.

सांगली  :  अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापासून राज्याच्या दैाऱ्यावर आहेत. सोलापूरपासून ते दैाऱ्याला सुरवात करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर निशाना साधला आहे. "आम्ही मागे लागून गोळ्या झाडल्यानंतर मुख्यमंत्री अखेर घरातून बाहेर पडणार आहेत," अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर केली आहे. सांगली येथे पत्रकारांशी ते बोलत होते. 

राज्य सरकरने मदतीबाबत केंद्राकडे मागणी केली का ? राज्य सरकारने कागदावर नुकसानीचा तपशील नोंदवला आहे का?, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्यासह अन्य मागाण्यांसाठी आगामी काळात आंदोलने करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "विरोधक आक्रमक झाले तर आपली आमदारकी धोक्यात येईल, अशी भीती सत्ताधारी पक्षातील काही आमदारांना वाटत आहे. त्यामुळे हे आमदार स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांवर सरकारमधून बाहेर पडण्यासाठी दबाव आणत आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत आहे." 

राजू शेट्टीबाबत ते म्हणाले की  राजू शेट्टी यांना विधानपरिषदेचे वेध लागल्याने ते शांत बसले आहेत. एरवी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजू शेट्टी आवाज उठवित असतात.  

संबंधित लेख