सत्तेचा गैरवापर करण्यात भाजप एक नंबर : अजित पवार 

काही जण स्वत:हून काहीही जाहीर करतात. पक्ष त्यांना तिकीट देईल की नाही आणि दिले तरी निवडून येतील की नाही, अशी परिस्थिती असताना हे लोक पोपटासारखे बोलत आहेत.
BJP number one in abuse of power: Ajit Pawar
BJP number one in abuse of power: Ajit Pawar

पुणे : "सत्तेचा गैरवापर करण्यात भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे. राज्यातील महापालिकांच्या गेल्या वेळी झालेल्या वॉर्ड रचनेवरून हे स्पष्ट झाले आहे. यावेळी असे होणार नाही; कारण या वेळी मी आहे,' या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वॉर्ड रचनेबाबत कार्यकर्त्यांना आश्‍वस्त करीत भारतीय जनता पक्षावर टीका केली. 

राज्यातील महापालिका निवडणुका महाआघाडीतील घटक पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत. मात्र, कॉंग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचे वक्तव्य कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी गेल्या आठवड्यता मुंबईत केले होते. त्याचा समाचार घेताना पवार यांनी कॉंग्रेस नेत्यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले,"काही जण स्वत:हून काहीही जाहीर करतात. पक्ष त्यांना तिकीट देईल की नाही आणि दिले तरी निवडून येतील की नाही, अशी परिस्थिती असताना हे लोक पोपटासारखे बोलत आहेत. मात्र, या लोकांकडे लक्ष देऊ नका; कारण महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रित लढवियाच्या की नाही, हे तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते ठरविणार आहेत'' 

अजित पवार म्हणाले की, "पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पदवीधरची निवडणूक संपल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. गेल्या निवडणुकीत आपल्यातील अनेकजण आपल्याला सोडून गेले. दबावाने आणि प्रलोभने दाखवून त्यांना नेण्यात आले,' 

"गेल्या चार वर्षांत महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा कारभार पुणेकरांनी पाहिला, स्मार्ट सिटीचे काय झाले, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे पदवीधरची निवडणूक होताच आपण महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करणार आहोत,' असे पवार यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com