राऊतांच्या विधानावरून तर्कविर्तकांना उधाण..म्हणाले..  - bjp is not your enemy in politics there is no permanent friendship or rivalry says shivsena leader sanjay raut   | Politics Marathi News - Sarkarnama

राऊतांच्या विधानावरून तर्कविर्तकांना उधाण..म्हणाले.. 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

मी भाजपला विरोधी पक्षच मानत नाही

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपबाबत केलेल्या व्यक्तव्यावरून राजकीय वर्तुळात तर्कविर्तकांना उधाण आले आहे. राऊतांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राऊत आज पत्रकारांशी बोलत होते. तुम्ही विरोधी पक्षाला संक्रातीच्या काय शुभेच्छा द्याल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. 

संजय राऊत म्हणाले, ''राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. भाजपसोबत आम्ही 25 वर्षे जवळून काम केले आहे. मी भाजपला विरोधी पक्षच मानत नाही, ते आमचे सहकारीच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी शत्रुत्व असण्याचं कारण नाही. भाजपने सरकारबाबत सकारात्मक विचार करावा, एवढ्याच त्यांना गोड शुभेच्छा आहेत''

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे  यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''धनंजय मुंडे यांचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे. हा राजकारणाचा मुद्द्या होऊ शकत नाही. मुंडेबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योग्य निर्णय घेतील. या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येईल हा भ्रम आहे.'' 

मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. तिने तिच्या जिवाला धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार तरुणीची पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने ट्विट करीत हा प्रकार मांडला आहे.

या ट्विटमध्ये तिने मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. ही तक्रार 10 जानेवारीला देण्यात आली होती. ती 11 जानेवारीला मुंबई पोलिसांकडून स्वीकारण्यात आली आहे. या तरुणीने पंतप्रधान मोदींना ट्विट करीतही न्याय मागितला आहे. 

तक्रारीवर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. या सर्व प्रकरणात आता पोलिस गुन्हा दाखल करणार का, मुंडेची आमदारकी रद्द होऊ शकते का, असे प्रश्न विचारले जात आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही तर पोलिसांच्या अंगलट हे प्रकरण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख