मंत्री बच्चू कडूंनी वाढवले देवेंद्र फडणवीसांचे टेन्शन

भाजप सरकार पडणार असा प्रचार भाजप करीत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून भाजपचेच आमदार फु़टणार असा प्रचार प्रत्युत्तरादाखल सुरू असल्याचे दिसत आहे.
bjp mla in touch with mahavikas aaghadi bachhu kadu says
bjp mla in touch with mahavikas aaghadi bachhu kadu says

पुणे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेते रोज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवत असताना आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांचे टेन्शन वाढविणारा दावा केला आहे. 

बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे नेते आमदार आहेत. त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. भाजपकडून मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ले चढवले जात असताना बच्चू कडू यांनी प्रतिहल्ला चढवला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून आमदार फोडण्याचा दावा केला जात आहे. ऑक्टोंबरमध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार हे खात्रीने सांगितले आहे. फडणवीस मुख्यमंत्री होणार म्हणून राज्यपाल नियुक्त आमदारांची प्रक्रिया थांबवण्यात आल्याचे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस हे आक्रमकपणे सरकार पडण्याचा दावा करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशीच त्यांचं सरकार कोसळेल आणि तोपर्यत वाट बघणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे.

कर्नाटक आणि मध्य प्रदेशात 'ऑपरेशन कमळ' सशस्वी झाल्यानंतर आता राजस्थानचे सरकार भाजपने अस्थिर केले आहे. तेथील असंतुष्ठ भाजप आमदारांना भाजपशासित हरियाणात लपवून ठेवण्यात आले आहे. राजस्थानचा विषय संपल्यानंतर भाजप महाराष्ट्राकडे लक्ष देवू शकते. तसे ऑपरेशन महाराष्ट्रात झाले तर महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे आमदार फुटू शकतात, पण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपचेच 40 आमदार फुटण्याच्या तयारीत आहेत. बच्चू कडूंच्या या दाव्यामुळे फडणवीसांची डोकेदुखी वाढू शकते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील हे घरवापसीच्या तयारीत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहेत. यापार्श्वभुमीवर बच्चू कडू यांचा दावा समोर आला आहे. फुटणाऱ्या भाजपच्या 40 आमदारांची यादी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन आठवड्यापुर्वी काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनीही भाजप आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी असा दावा यापुर्वीच केलेला आहे. 

एन. डी. पाटील तासगाव कारखान्याच्या लढ्यात

पुणे : तासगाव साखर कारखानाप्रश्नी जेष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महेश खराडे यांनी भेट घेतली. तेव्हा "सभासद, कामगार यांच्या अस्तित्वासाठी नेटाने लढा द्या. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आपण सभासदांचा मेळावा घ्या.त्या मेळाव्याला मी उपस्थित राहीन," असे पाटील यांनी खराडे यांना सांगितले. 

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com