संजय राठोडांच्याविरोधात महिला रस्त्यावर..भाजपचं चक्काजाम आंदोलन..

संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, यासाठी मुंबईत आज भाजपच्या महिला नेत्यांकडून ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.
bjp27.jpg
bjp27.jpg

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, यासाठी मुंबईत आज भाजपच्या महिला नेत्यांकडून ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. महामार्ग अडवून हे आंदोलन सुरू आहे. ठाण्यात भाजप महिला मोर्चाच्यावतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या महिलांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष उमा खापरे या हरी ओम नगर, म्हाडा कॉलनी नंतरचा सिग्नल, मुलुंड पूर्व हायवे येथे चक्का जाम आंदोलन करणार असल्याने पोलिसांकडून परिसरात कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपच्या महिला कार्यकर्ता आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.

टीकटाँक स्टार पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पुण्याच्या लष्कर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याबाबतचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. 'पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करावा,' अशी मागणी हा अर्जात करण्यात आली आहे. लीगल जस्टीस सोसायटीतर्फे अॅड भक्ती पांढरे यांनी आज लष्कर न्यायालयात हा अर्ज केला आहे.   

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी कोणाची तक्रार नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही, अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतल्यानंतर या प्रकरणात खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी काल थेट वानवडी पोलिसांकडे अर्ज देऊन वनमंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे. 

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी याबाबत काल पुण्यात येऊन पुणे पोलिसांवर तोफ डागली होती. त्यानंतर पुण्यातील पदाधिकारीही जागे झाले आणि त्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्यास सुरवात केली. पूजा चव्हाण हिचा मृत्यू पुण्यात झाला आणि त्याबाबत संशय व्यक्त होत असतानाच पुण्यातील भाजपचे पदाधिकारी मात्र यावर अधिकृतरित्या चकार शब्द काढत नव्हते. काल बापट यांनी तक्रार देऊन या प्रकरणात लक्ष घातले.  

पूजा चव्हाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाकडून गुरुवारी सकाळी वानवडी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर स्वरदा बापट यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जानुसार, 7 फेब्रुवारीला पुजा चव्हाणची आत्महत्या झाल्यनंतर याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात मंत्री संजय राठोड व मृत पूजाच्या नावाच्या संभाषणाच्या 12 ऑडीओ क्‍लीप व्हायरल झाल्या होत्या. 

ऑडीओ क्‍लिपनुसार मंत्री राठोड यांनी पुजा चव्हाणच्या मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचे आदेश अरुण राठोड नावाच्या युवकाला दिले. ऑडीओ क्‍लीपवरून राठोड यांचे पूजाशी संबंध होते. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून, प्रेमभंग, किंवा त्याच्याकडून दबावाला व छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे. यानुसार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करणे यासाठी भारतीय दंड संहिता कलम 306 आणि 107 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करताना त्यांना अटक करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com