दाजी, पोस्ट टाकण्याआधी माहिती घ्या...राम कदमांना झोडपले

राम कदम ट्रोल झाले आहेत. कारण त्यांनी ट्विट केलेला हा फोटो फेक आहे.अमेरिकेत टाइम्स स्क्वेअरला कोणत्याही प्रकारचा प्रभू रामचंद्रांचा फोटो दाखवण्यात आला नाही.
Ram Kadam.jpg
Ram Kadam.jpg

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिर भूमीपूजन सोहळा काल उत्साहात साजरा झाला. राम मंदिराचे कित्येक वर्षांचे स्वप्न पूर्ण होताना भाजपच्या नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. 

याच दरम्यान भाजपचे आमदार राम कदम यांनी राम मंदिर भूमीपूजनाच्या निमित्ताने todays proud moment या कॅपशनने प्रभू रामचंद्रांचा फोटो ट्विट केला आहे. इथपर्यंत ठीक होत. पण त्याचबरोबर Times_Square #USA #AyodhyaBhoomipoojan #ModiHaiTohMumkinHai हे हॅशटॅग वापरले होते. 

यावरून राम कदम ट्रोल झाले आहेत. कारण त्यांनी ट्विट केलेला हा फोटो फेक आहे. अमेरिकेत टाइम्स स्क्वेअरला कोणत्याही प्रकारचा प्रभू रामचंद्रांचा फोटो दाखवण्यात आला नाही.


 त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच वेठीला धरले आहे. एकाने राम कदम यांच्या ट्विटला रिप्लाय देत लिहिले आहे की, आता तिकडे रात्र असेल ना….कसे काय असले एडिट फोटो आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून शेयर करू शकता. दाजी आता तिकडे जवळपास सकाळचे 5:30 वाजलेत आणी हि पोस्ट 1 तास आधीची आहे म्हणजे रात्री 4:30 वाजता तिकडे एवढा प्रकाश आणि वर्दळ असते. 

लोकप्रतिनीधींनी तरी IT Cell च्या पोस्ट टाकण्याआधी थोडी माहिती घ्यावी. अशा प्रकारचा सल्ला एकाने त्यांना दिला आहे. काहींनी कॉमेंट केली आहे की, कृपया आमच्या भावना दुखवू नका डिलीट करा ती पोस्ट. तरी काही वृत्तसंस्थानी हा फोटो फेक असल्याचे सांगितले होते. सोशल मीडियावर फोटो एडिटिंगद्वारे राम मंदिराबाबत बनवलेले अनेक फोटो फिरत आहेत. पण ते फोटो खरे आहेत की खोटे हे तपासणे गरजेचे आहे. 

हेही वाचा : वाढदिवसानिमित्त 'या' मंत्र्यानी केले प्लाझ्मादान...

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केले. कोरोनामुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे; जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले. याबाबतची माहिती आव्हाड यांनी आपल्या टि्वटरवरून दिली आहे. काही दिवसापूर्वी जिंतेद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर त्यांनी आपण प्लाझ्मादान करणार असल्याचे टि्वट केले होते. त्यानुसार त्यांनी काल आपल्या वाढदिवशी ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केले.  आव्हाड यांनी आपला वाढदिवशी साजरा न करण्याचे आव्हान कार्यकर्त्यांना केलं होतं. वाढदिवस साजरा न करता गरीबजनता आणि कोरोनाची लढाई लढणाऱ्या कोरोना योध्दांसाठी उपक्रम राबवा, असे आव्हाड यांनी सांगितले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com