गणेश माने देशमुख काँग्रेसमध्ये : अक्कलकोटमधील समीकरणे बदलणार - BJP leader Radhakrishna Vikhe Patil's son in law Ganesh Mane Deshmukh joined Congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

गणेश माने देशमुख काँग्रेसमध्ये : अक्कलकोटमधील समीकरणे बदलणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 मार्च 2021

गणेश माने देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अक्कलकोट : गणेश माने देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अक्कलकोट मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. 
 
गणेश माने देशमुख हे पूर्वी शेकापशी संबधीत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून इच्छुक होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शेतकऱ्याचा मेळावा घेतला होता. ते भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्नात होते. त्यांनी काल मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार प्रणिती शिंदे, धवलसिंह मोहिते पाटील,जिल्हाध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते. 

जयहिंद शुगर्सचे चेअरमन असलेल्या गणेश माने देशमुख यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष उभारणीसाठी प्रचंड मोठा फायदा होणार आहे. सहकार क्षेत्रात जयहिंद परिवाराच्या यशस्वी वाटचालीत गणेश माने देशमुख यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्यामूळे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल, असा अंदाज राजकीय वर्तृळातुन व्यक्त होत आहे. आचेगाव सारख्या अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या तालुक्यातील सीमेवर कारखाना सुरू करून शेतकरी बांधवाना दिलासा दिला देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी बांधवांच्या प्रती आस्था ठेऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्नकरणारे माने कुटुंबीय यांची गणेश माने देशमुख यांच्या रूपाने काम करीत असलेली युवा पिढी आहे. 

दुष्काळी भागातील जनतेला आणि शेतकरी यांच्यासाठी पाण्याची कमतरता भासू नये तसेच सेंद्रिय शेतीवर काम करणारे एक अभ्यासु उमदे नेतृव अशी त्यांची ख्याती आहे. आता ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपली राजकीय कारकीर्द अजमाविण्यासाठी प्रारंभ केला आहे. त्यांच्या समर्थकानी या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

गणेश माने बापू हे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पुणे (सीओईपी)चे विद्यार्थी आहेत. येत्या काळात काँग्रेस पक्षाचे काम तळागाळातील जनतेपर्यत पोचवून जनतेच्या उत्कर्षात माझा सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे म्हटले आहे.

Edited  by :  Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख