शिवसेनेचा इतर राज्यात एक आमदार, नगरसेवकपण निवडून आला नाही..राणेंची टीका  

पश्चिम बंगालच्या आखाड्यात शिवसेना उतरणार नसल्याने निलेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
Sarkarnama Banner.jpg
Sarkarnama Banner.jpg

मुंबई :  पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरूद्ध भाजप अशी लढत येथे होणार आहे.  बिहार निवडणुकांनंतर शिवसेना पश्चिम बंगालमध्ये देखील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. इतकच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बंगालच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं देखील बोललं जात होतं.

पश्चिम बंगालच्या आखाड्यात शिवसेना उतरणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यावरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेच्या या माघारीवरून शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

निलेश राणे यांनी याबाबत टि्वट केलं आहे. ते म्हणतात की जो पक्ष महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात एक नगरसेवक निवडून आणू शकत नाही तो शिवसेना पक्ष बंगालमध्ये निवडणूक लढणार नाही कारण ममता दीदी तिकडच्या वाघीण आहेत.. काय कारण शोधलय. शिवसेना कधीच खरं बोलणार नाही की इतर राज्यात १ आमदार काय १ नगरसेवक पण कधी निवडून आला नाही पण ते सांगणार कसं.

ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी भाजपने  खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज पश्चिम बंगालमध्ये उतरवली आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे सरकार आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी बंगालच्या निवडणुकांबाबतची पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांना शिवसेनेचा पाठींबा असल्याचं सांगत शिवसेना निवडणूक लढवणार नसल्याची माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट करून भाष्य केलं आहे.
 
पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून, ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या, तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडून आले होते. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या वेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 18 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच  चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com