अपघातात भाजप नेते मुनगंटीवार यांच्या बहिणीचा मृत्यू...

सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहिण ममता तगडपल्लेवार व भाऊजी विलास तगडपल्लेवार हे स्विफ्ट डिझायर कारमधून पुण्याच्या दिशेने जात होते.
mg24.jpg
mg24.jpg

बीड : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील मातोरी परिसरात भरधाव कार कंट्रोल न झाल्याने कार खोल अशा नाल्यात कोसळली. यामध्ये दोघा पतीपत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. हे दाम्पत्य हे भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नात्याने चुलत बहीण व भाऊजी आहेत. 

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहिण ममता तगडपल्लेवार व भाऊजी विलास तगडपल्लेवार हे स्विफ्ट डिझायर कारमधून पुण्याच्या दिशेने जात होते. यावेळी कल्याण-विशाखापट्टनम महामार्गावर मातोरी परिसरामध्ये कारवरील ताबा सुटल्याने कार खोल अशा नाल्यात जाऊन कोसळली.

या अपघातात कारचा अक्षरशः चुरा झाला आहे. तर यामध्ये विलास तगडपल्लेवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर ममता तगडपल्लेवार यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी चकलंबा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

हेही वाचा : चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत वेळीच पाऊल उचलले असते तर...!
 
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील सत्तांतर राज्यभर चर्चेचा विषय बनले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील राजकीय द्वंद्वात पुन्हा एकदा जयंत पाटील भारी पडले. मात्र, या सत्तांतराला कॉंग्रेस आघाडीपेक्षा आपल्याच पक्षातील असंतोषाकडे भाजप नेत्यांनी केलेले दुर्लक्ष भोवले आहे. यावर भाजपच्या कोअर कमिटीत चिंतन होईल. पण, महापालिकेतील आपले उर्वरित नगरसेवक सांभाळणे हेच आता त्यांच्यासमोर पहिले आव्हान असेल ! सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेत सन 2018 मध्ये प्रथमच भाजपची स्वबळावर सत्ता आली होती. कॉंग्रेसचे नेते मदन पाटील हयात असेपर्यंत महापालिकेचे राजकारण त्यांच्याभोवती फिरत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेस एकसंध राहिली नाही. शिवाय, राज्यात भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता होती. त्याचा फायदा घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली महापालिकेतील कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. आधी कॉंग्रेस, राष्ट्रवादीला खिंडार पाडून भाजपमध्ये मेगाभरती करून घेतली. मग स्वबळावर 41 जागा जिंकून महापालिकेवर झेंडा फडकवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com