'कोरोना' आटोक्‍यात आणण्यासाठी खासगी लॅबला तपासणीची परवानगी द्या:गिरीश महाजन

'कोरोना'संसर्ग जळगाव जिल्ह्यासह राज्यात वाढत आहे. जळगाव जिल्हा तर 'हॉटस्पॉट' होण्याच्या मार्गावर आहे
bjp leader girish mahajan demand private lab permission for covid testing
bjp leader girish mahajan demand private lab permission for covid testing

जळगाव : "कोरोना'संशयीत रूग्णाचा 'स्वॅब' अहवाल येण्यास तब्बल सहा ते सात दिवस लागतात, याकाळात "पॉझिटीव्ह' पेशंट अनेक जणांना भेटतो, त्यामुळे रूग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अहवाल तातडीने मिळण्यासाठी खासगी लॅबला परवानगी देण्यात यावी अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनाही पत्र लिहील्याचे त्यांनी सांगितले.

'कोरोना'संसर्ग जळगाव जिल्ह्यासह राज्यात वाढत आहे. जळगाव जिल्हा तर 'हॉटस्पॉट' होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत चिंता व्यक्त करून ते म्हणाले, कि शासनातर्फे "कोरोना' संशीयतांचे अहवाल येण्यास विलंब होत आहे. त्यामुळेच रूग्णसंख्येत वाढ होत आहे. संशयीताचा 'स्वॅब' घेतल्यानंतर त्यांचा अहवाल येण्यास सात ते आठ दिवस लागतात. या काळात संशयीत रूग्ण सर्वत्र फिरत असतो, तो अनेकांना भेटत असतो. त्याचा पॉझिटीव्ह आल्यानंतर मात्र मग प्रशासनासह सर्वाचीच धावपळ सुरू होते. या काळात तो पेशंट भेटलेल्यांना क्वॉरंटाईन केले जाते. केवळ अहवाल विलंबामुळेच हे होत आहे. आज शासनाच्या सर्वच लॅबवर तपासणीची गर्दी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अहवालही ताबडतोब मिळू शकत नाही. त्यामुळे शासनाने ताबडतोब खासगी लॅबला चाचणीसाठी परवानगी देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे या लॅब सवलतीच्या दरात तपासणी करून देण्यास तयार आहेत. खासगी लॅबला परवानगी दिल्यास शासकीय लॅबवर असलेला "लोड' कमी होईल. शिवाय अगदी एका दिवसात अहवाल प्राप्त होवून रूग्णावर ईलाजही सुरू होईल. शिवाय हा रूग्ण अधिक जणांना भेटणार नाही. त्यामुळे इतर रूग्ण संख्याही कमी होईल. शिवाय पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार सुरू होवून तो लवकर बरा होईल.
 
जिल्ह्यासह राज्यातील 'कोरोना' रूग्णांच्या वाढत्या संख्येबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र दिले आहे. राज्यातील रूग्ण संख्या कमी करून तातडीने उपाय होण्यासाठी खासगी लॅबला तपासणीची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांना केली आहे. मात्र त्याबाबत त्यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. जर त्यांनी ताबडतोब त्यांनी निर्णय घेतला तर राज्यात ही रूग्णसंख्या आटोक्‍यात येईल असा विश्‍वास आहे. 

राज्यात आज १६०२ नविन कोरोना रुग्णांचे निदान 
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २७ हजार ५२४ झाली आहे. आज १६०२ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५१२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ४० हजार १४५ नमुन्यांपैकी २ लाख १२ हजार ६२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २७ हजार ५२४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com