भाजपचे नेते, माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन   - BJP leader former MLA Sardar Tarasingh passes away | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे नेते, माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

भाजपचे नेते, माजी आमदार सरदार तारासिंह यांचे आज मुंबईत लिलावती रूग्णालयात निधन झाले.

मुंबई : भाजपचे नेते, माजी आमदार सरदार तारासिंह यांचे आज मुंबईत लिलावती रूग्णालयात निधन झाले, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सैामय्या यांनी टि्वट करून दिली आहे. सैामय्या यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे की "माझे ज्येष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंह यांचे प्रदीर्घ आजाराने लिलावती रुग्णालयात आज सकाळी  निधन झालं. ईश्वर त्यांच्या आत्मास शांती प्रदान करो." 

मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदार संघाचे सरदार तारासिंह हे आमदार होते. या मतदारसंघातून ते सलग चार वेळा आमदारपदी निवडून आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून  2018 मध्ये त्यांनी नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. सरदार तारासिंह यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला मुंबई महापालिकेतून सुरुवात केली होती. ते नगरसेवक म्हणून निवडून आले होतं.  2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.

काही दिवसापासून तारा सिंह यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी सैामय्या यांनी त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगून या अफवांवर पडदा टाकला होता. गेल्या वर्षी सरदार तारा सिंह यांचा मुलगा रणजित सिंह याला मुंबई पोलिसांनी पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणामध्ये अटक केली होती.
 

हेही वाचा #आंबेडकर स्मारक ; आमंत्रण आले तरी जाणार नाही...   
पुणे : दादर इंदू मिल या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याची पायाभरणी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होती. मात्र, या कार्यक्रमाला बाबासाहेबांचे नातू व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर तसेच इतर नेत्यांना बोलवण्यात आले नसल्याने हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. मात्र आपल्याला आता आमंत्रण आले तरी या पायाभरणी कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. देशाला पुतळ्याची गरज नसून रुग्णालयाची गरज आहे. त्यामुळे राज्यात या पैशाचा उपयोग कोरोना सेंटर उभारण्यात करावा, असे स्पष्ट मत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.  
  

  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख