आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत...

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
abrp.jpg
abrp.jpg

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत मलाही मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, अशी इच्छा व्यक्त केली होती. जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाची राज्यात चांगलीच चर्चा रंगली. या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जयंत पाटलांना माझा पाठींबा असल्याचे सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. अतुल भातखळकर यांनी टि्वट करून महाविकास आघाडीची खिल्ली उडविली आहे. आपल्या टि्वटमध्ये भातखळकर म्हणतात की आता महाविकास आघाडीत फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायची बाकी आहेत...

जयंत पाटील काय म्हणाले होते?

पाटील यांनी इस्लामपूरमध्ये एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत मुख्यमंत्री पदाबद्दलची इच्छा बोलून दाखवली होती. जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. का, असा प्रश्न विचारण्यात आला होता ? त्यावर पाटील म्हणाले, आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रीपद आलेलं नाही. माझी इच्छा असणारच. प्रत्येक राजकारण्याला मुख्यमंत्री व्हावंस वाटणारचं. पण, पक्ष म्हणजे शरद पवार हे जो निर्णय घेतील, तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा आहे. मला वाटतं सगळ्यानांच असेल.

एवढा दीर्घकाळ काम करणाऱ्याला, माझ्या मतदारांनाही असू शकते. त्यामुळे माझी जबाबदारी माझे मतदार आहेत. इच्छा आहे, पण परिस्थिती, संख्या… आमची ५४ आहे. ५४ आमदार असताना मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यासाठी पक्ष वाढला पाहिजे. संख्या वाढली पाहिजे. संख्या वाढली… पक्ष मोठा झाला, तर शरद पवार हे जो निर्णय घेतील तो,” असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दलची मनातील इच्छा बोलून दाखवली होती. 

तसेच मला मुख्यमंत्रीपदा पेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद जास्त भावते, अशी भावनाही जयंत पाटलांनी केली यावेळी व्यक्त केली. जयंत पाटील यांच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगू लागली आहे. 

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. आमदारांची संख्या सर्वाधिक असलेल्या शिवसेनेकडं मुख्यमंत्रीपद असून, राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आलेल आहे. पाटील यांनी इच्छा व्यक्त केल्या नंतर राजकीय वर्तुळात आता, चर्चा रंगू लागली आहे. की, शिवसेनेचे मुख्यमंत्रीपद हे अडीच वर्षासाठी आहे, की पाच वर्षासाठी आहे. याचे स्पष्टीकरण येत नाही, तो पर्यंत उद्धव ठाकरे यांचा उत्तराधिकारी कोण हा प्रश्नच आहे.
 
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com