ठाकरे सरकार जनतेवर नियमांचे आसूड का ओढत आहे...शेलारांचा सवाल   - bjp leader Ashish shelar warns state government of agitation Housing society | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे सरकार जनतेवर नियमांचे आसूड का ओढत आहे...शेलारांचा सवाल  

सरकारनामा ब्युरो
रविवार, 13 डिसेंबर 2020

आशिष शेलार यांनी याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

मुंबई : "ठाकरे सरकार मध्यमवर्गीयावर नियमांचे आसूड का ओढत आहे. सामान्य जनतेचा न्याय द्या, अन्यथा भाजप आंदोलन करीन," असा इशारा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारला दिला आहे. आशिष शेलार यांनी याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

आशिष शेलार म्हणाले, "राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार मध्यमवर्गीयावर नियमांचे आसूडच ओढले आहेत. प्रिमीयम कमी करू, अशा स्वरूपाची भूमिका ठाकरे सरकारनं मांडली होती. निर्णय तर घेतलाच नाही. पण जो निर्णय घेणार आहेत त्यामध्ये बांधकाम व्यावसायिकाचे हित आहे, ग्राहकाला दिलासा नाही. एनए टॅक्सच्या बाबतीत अगोदरच्या फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती उठवली आहे. निवासी भागात राहणाऱ्या नागरिकांना एनए टॅक्सच्या नोटिसा परत यायला लागल्या आहेत."

आशिष शेलार म्हणाले की रेडिरेकनरची फाईल, युडिसीआर, प्रिमियम सवलतीच्या फाईल मधून "लक्ष्मीदर्शन" करुन बिल्डर लॉबीच्या झोळ्या भरणाऱ्या ठाकरे सरकारचे मुंबईतील मध्यमवर्गीयांसाठी खिसा कापू धोरण आहे. मुंबईतील किमान 35 हजारो गृहनिर्माण सोसायट्यांना या "स्थगिती सरकारचा" फटका बसणार आहे.  

उद्यापासून हिवाळी अधिवेशनास सुरवात.. 
मुंबई : विधीमंडळाच्या दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात उद्यापासून (ता.14) सुरवात होणार आहे. महिला व बालकल्याण अत्याचाराबाबतच्या शक्ती कायदा विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची प्रथा आहे. कोरोनाच्या संकटामुळे हे अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ कामकाज सल्लागार समितीने घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारला नुकतेच वर्ष पू्र्ण झाले आहे.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निव़डणुकीमुळे महाविकास आघाडी सरकारला विजय मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात विरोधी पक्ष भाजप सरकारला कोणत्या प्रश्नांवर घेरणार हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी हे अधिवेशन 7 डिसेंबरला घेण्यात येणार होते. हिवाळी अधिवेशन मुंबईत झाल्यास उपराजधानीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले नागपुरात अधिवेशनासाठी आग्रही असल्याने सरकारकडून मार्चच्या अधिवेशनाची तयारी दर्शवण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे समजते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख