मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी योगी आदि्त्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. याबाबत मनसेने पोस्टर लावून टीका केली आहे. तर शिवसेनेही यावर टीका केली आहे.
"हिमंत असेल तर मुंबईची फिल्म सिटी उत्तर प्रदेशात शिफ्ट करून दाखवा," असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केले होते. काल सकाळी योगी आदित्यनाथ मुंबई येथे दोन दिवसांसाठी मुंबई दैाऱ्यावर आले आहेत. बॉलिवूड शिफ्ट होण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे.
आता भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टि्वट करून राज्य सरकारवर टीका केली आहे. बुलेट ट्रेन, जैतापुर आणि नाणार प्रकल्प होणार की नाही, याबाबत आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केला आहे. "सततच्या विरोधामुळे जैतापूर आणि नाणार होणार की जाणार? बुलेट ट्रेनलाही विरोधाचा ब्रेक..तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र परराज्यात गेले. "अशी" कार्यपद्धती फिल्म सिटीला मारक नाही ना ठरणार? महाराष्ट्राचे नुकसान करु नका!" असं टि्वट आशिष शेलार यांनी केलं आहे.
सततच्या विरोधामुळे
जैतापूर आणि नाणार होणार की जाणार?
बुलेट ट्रेनलाही विरोधाचा ब्रेक..
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे
आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र परराज्यात गेले.
"अशी" कार्यपद्धती फिल्म सिटीला मारक नाही ना ठरणार?
महाराष्ट्राचे नुकसान करु नका!— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 3, 2020
योगींचे स्वागतच.. मुंबईतले उद्योग पळविणे कोणाच्या बापाला शक्य नाही...
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी योगी आदि्त्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. काल त्यांनी मुंबईतील काही कलाकार, उद्योगपतीशी याबाबत चर्चा केली. यावरून शिवसेनेने योगी आदित्यनाथ यांना लक्ष केले आहे.
बहुसंख्य उत्तर प्रदेशची स्थिती ‘मिर्झापूर’प्रमाणेच असल्याचा आरोप योगी राज्यातील विरोधक करीत असतात. आता ‘मिर्झापूर-3’ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच आहे. योगी महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उत्तर प्रदेशचा विकास झालाच व त्यातून रोजगार निर्मिती घडली तर मुंबईवरील बराचसा ताण कमी होईल. त्यामुळे योगींच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही, असा इशारा शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून योगी आदित्यनाथ यांना देण्यात आला आहे.

