मोदी हे फार सळमार्गी नेते आहेत..राऊतांची खोचक टीका

"मोदी काँग्रेसच्या मार्गावर चालले आहेत. ते फार सळमार्गी नेते आहेत," असे राऊत म्हणाले.
modi1.jpg
modi1.jpg

मुंबई :  देशातल्या नागरिकांना लस देण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. ६० वर्षांवरील व्यक्ती व विविध आजार असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्समध्ये कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना मोदींवर टीका केली आहे. 

संजय राऊत म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरळमार्गी नेते असून त्यांची वाटचाल काँग्रेसच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली. यावेळी मोदींचा पेहरावाबाबत राऊत यांनी टीका केली आहे. "राष्ट्रीय एकात्मता हा काही एकट्या काँग्रेसचा मक्ता नाही, नरेंद्र मोदींच्या कृतीकडे राजकारण म्हणून नव्हे तर राष्ट्रीय एकात्मता म्हणून पाहायला हवे," अशी खोचक टिप्पणी राऊत यांनी केली आहे. "मोदी काँग्रेसच्या मार्गावर चालले आहेत. पूर्वी काँग्रेसचे नेतेही अशाच भूमिका घेत होते. ते फार सळमार्गी नेते आहेत," असे राऊत म्हणाले.

 
आजपासून देशातल्या नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. ६० वर्षांवरील व्यक्ती व विविध आजार असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाणार आहे. आज है औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्समध्ये कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. स्वतः पंतप्रधानांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.  कोरोना जागतिक महामारीमध्ये आपल्या डाॅक्टरांनी आणि शास्त्रज्ञांनी जे काम केले ते उल्लेखनीय असल्याचं सांगत पंतप्रधानांनी या सर्वांचं कौतुक केलं. जे आजपासू लस घेण्यास पात्र आहेत, त्या सर्वांनी लस घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

देशात कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून, आरोग्यसेवकांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येत आहे. आता लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे.  सोमवारपासून (१मार्च) ६० वर्षांवरील नागरिक आणि विविध आजार असलेले ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. सरकारी रुग्णालात ही लस मोफत तर खासगी रुग्णालयात सशुल्क देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने लशीची किंमत २५० रुपये निश्चित केली आहे.  

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास १६ जानेवारीला देशात सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्र सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यानंतर ही लस ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील रुग्णांचा यात समावेश असेल. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी २५० रुपये मोजावे लागतील. यात १०० रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com