भाजपचा मुंबई पोलिसांविषयी संशय : अधिकाऱ्यांना निलंबित करा, आयुक्तांना रजेवर पाठवा!

चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांची भूमिका तसेच मुंबई शहराचे पोलिस आयुक्त श्री. परमवीर सिंग यांचीही भूमिका हलगर्जीपणाची राहिली आहे, असा आरोपया पत्रात करण्यात आला आहे.
atul Bhatkhalkar-Mumbai Police
atul Bhatkhalkar-Mumbai Police

मुंबई : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी भाजपने आता आणखी आक्रमक भूमिका घेतली असून याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करावे आणि मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

केंद्र सरकारने सुशांत सिह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे दिला आहे. त्यानंतर भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून पोलिसांच्या तपासाविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

ठाकरे यांना लिहिलेेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की तुम्ही एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सीबीआय काय इंटरपोलने जरी चौकशी केली तरी आमची काही हरकत नाही. त्यामुळे राज्य सरकार सीबीआय चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी आणणार नाही असा मला विश्वास आहे व त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्यास मदतच होईल. 
परंतु सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला ५० दिवस उलटून गेले असतानाही पोलिसांनी साधा एफआयआर देखील दाखल केला नाही. तसेच दिशा सालियनाच्या आत्महत्येनंतर ५० दिवसांनी या संदर्भातील माहिती असल्यास ती आम्हाला द्यावी असे प्रसिद्धीपत्रक पोलिसांनी काढले. यामुळे या दोन्ही प्रकरणांची चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांची भूमिका तसेच मुंबई शहराचे पोलिस आयुक्त श्री. परमवीर सिंग यांचीही भूमिका हलगर्जीपणाची राहिली आहे, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

प्रकरणातील पुरावे जाणीवपूर्वक नष्ट केले जात आहेत अशा प्रकारची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार याबाबतीत कुठलीही लपवाछपवी करत नाही आहे याकरिता या दोन्ही पोलिस अधिकार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व मुंबई शहर पोलिस आयुक्त श्री. परमवीर सिंग यांना हा तपास किमान विशिष्ट टप्प्यावर येईपर्यंत तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी मी या पत्राद्वारे आपल्याकडे करीत आहे.     

या संदर्भात आपण योग्य ते निर्णय घेतले नाहीत तर हे सर्व पोलिस प्रशासन सेवेतील अधिकारी असल्यामुळे मी केंद्रीय गृहमंत्र्याकडे या संदर्भात दाद मागेन याची आपण कृपया नोंद घ्यावी, ही विनंती, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com